Wednesday, 18 September 2019

आता 70 किमी अंतरावरुनही F-16 पाडणं शक्य.

संरक्षण संशोधन विकास संस्था म्हणजे डीआरडीओने विकसित केलेल्या अस्त्र मिसाइलमुळे भारताची हवाई सुरक्ष अधिक बळकट होणार आहे. अस्त्र हे एअर टू एअर हल्ला करणारे मिसाइल  आहे.

तर इंडियन एअर फोर्सच्या सुखोई-30 एमकेआय या अत्याधुनिक फायटर विमानामधून ‘अस्त्र’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. सुखोईमधून डागण्यात आलेल्या अस्त्र क्षेपणास्त्राने हवेतील लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

क्षेपणास्त्राची वैशिष्टये :

अस्त्र हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे पहिले बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे दृष्टीपलीकडचा लक्ष्यभेद करणारे एअर तो एअर मिसाइल आहे.

अस्त्र ताशी 5,555 किलोमीटर वेगाने लक्ष्याच्या दिशेने झेपावते.

अस्त्रमध्ये 70 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे.

अस्त्र 15 किलोपर्यंत वॉरहेड म्हणजे स्फोटके वाहून नेऊ शकते.

अस्त्रची रचनाच लघु आणि दीर्घ पल्ला तसेच वेगवेगळया उंचीवरील लक्ष्यभेदण्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.

अस्रची सुखोई-30 एमकेआयमधून चाचणी करण्यात आली असली तरी मिराज-2000 आणि मिग-29 विमानांमध्येही हे मिसाइल बसवण्यात येईल.

डीआरडीओने अस्त्रची निर्मिती 50 अन्य सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांच्या मदतीने केली आहे.

सुखोईला अस्त्र मिसाइलने सुसज्ज करण्यासाठी एचएएलने या फायटर विमानामध्ये काही बदल केले आहेत.

भविष्यात अस्त्रचा पल्ला 300 किलोमीटरपर्यंत करण्याची डीआरडीओची योजना आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...