Sunday, 29 September 2019

मोबाईलची 5-जी सेवा वर्ष 2022 पासून भारतात

◾️सध्या भारतात 4-जी मोबाईल सेवेचा लाभ घेणारे कोट्यवधी ग्राहक आढळून येतात. मात्र जगभर आता 5-जी या अतिशय वेगवान आणि उत्तम बॅंडविडथ असलेल्या मोबाईल्सची चलती आहे.

◾️दूरसंचार क्षेत्रात भारतात झालेल्या मोबाईल क्रांतीमुळे नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने नुकतीच नव्या टेलिकॉम धोरणाला मंजूरी दिली असून वर्ष 2022 पर्यंत देशात 5-जी सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक वेगवान तंत्रज्ञान आणि रोजगार निर्मिती होणार आहे. याद्वारे दहा हजार कोटी डॉलर्सच्या गुंतवणुकीला आकर्षित करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

◾️या नव्या टेलिकॉम धोरणाचे नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी (एनडीसीपी) असे नामकरण करण्यात आले आहे.

◾️या धोरणाच्या मसुद्यानुसार, एनडीसीपीचे ध्येय फाईव्ह-जी तंत्रज्ञान आणि ऑप्टिकल फायबर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने देशभरात हायस्पीड ब्रॉडबॅण्ड सेवा रास्त दरात उपलब्ध करून देणे, असणार आहे.

◾️त्याचबरोबर टेलिकॉम कमिशनचे नाव बदलून डिजिटल कम्युनिकेशन्स कमिशन, असे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या धोरणानुसार, डिजिटल कम्युनिकेशनसाठी निरंतर आणि परवडणारी सेवा देण्यासाठी स्पेक्‍ट्रमची सर्वोत्तम किंमत मिळवण्याची तरतूद करण्यात आली आहे. साडेसात लाख कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या टेलिकॉम क्षेत्रासाठी स्पेक्‍ट्रमची सर्वोत्तम किंमत आणि त्यासंबंधीचे शुल्क ही महत्त्वाची बाब ठरणार आहे.

◾️त्याचबरोबर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या टेलिकॉम सेक्‍टरचे पुनरुज्जीवन करण्यासाठी स्पेक्‍ट्रम शुल्काची तर्कशुद्ध आकारणी करण्यात येणार आहे.

◾️या नव्या धोरणानुसार, प्रत्येकाला 100 मेगाबाईट प्रति सेकंद या वेगाने ब्रॉडबॅण्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

◾️तसेच फाईव्ह-जी सेवा आणि 2022 पर्यंत 40 लाख नवे रोजगारही उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...