💢 देशाचा नकाशा तयार करण्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) प्रथमच ड्रोनचा वापर करणार आहे.
💢 योजनेनुसार ड्रोन या अद्ययावत तंत्राचा वापर करून हाय-रिझोल्यूशन असलेले नकाशे तयार करण्यात येणार आहेत.
💢 पुढील दोन वर्षांत भारतीय भूप्रदेशाचा एकूण 75% भौगोलिक भाग, म्हणजेच एकूण 3.2 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी सुमारे 2.4 दशलक्ष चौ.किमी.चा नकाशा तयार केला जाणार आहे.
💢 सध्या सर्वोत्कृष्ट नकाशांचे रिझोल्यूशन (पृथक्करण) 1: 250000 असे आहे, म्हणजेच नकाशावरील 1 सेंटीमीटर हे भुमीवरील 2500 सेंटीमीटर दर्शविते.
💢 योजनेनुसार नवा नकाशा 1:500 रिझोल्यूशनचा असणार आहे.
⭕️ भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) ⭕️
💢 भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) या संस्थेचे मूळ सन 1767 मध्ये आहे.
💢 हे भारतातला सर्वांत जुना वैज्ञानिक विभाग आणि जगातल्या सर्वात जुन्या सर्वेक्षण आस्थापनांपैकी एक आहे.
💢 सर्व्हेयर जनरल ऑफ इंडिया हे या संस्थेचे प्रमुख आहेत.
💢 सध्या हे पद लेफ्टनंट जनरल गिरीश कुमार यांच्याकडे आहे.
💢 संस्थेचे मुख्यालय देहारादून (उत्तराखंड) येथे आहे.
💢 देशाचे शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षण आणि नकाशा तयार करण्यासाठी कर्नल लॅम्ब्टन आणि सर जॉर्ज एव्हरेस्ट या प्रसिद्ध सर्वेक्षकांनी 10 एप्रिल 1802 रोजी ‘ग्रेट ट्रीग्नोमेट्रिक सर्व्हे (GTS)’चा पाया रचला होता.
⭕️ भारताचा भूगोल ⭕️
💢 भारत देशाचे भौगोलिकदृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात.
💢 भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.
💢 भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता.
💢 पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले.
💢 साधारणपणे 5 कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली.
💢 भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला.
💢 आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. गंगेच्या खोर्याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे.
💢 अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये गणला जातो
💢 अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे.
💢 पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो.
💢 दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत.
💢 दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ निर्माण आहेत.
💢 भारताला एकूण 7,517 किलोमीटर (4,671 मैल) इतका समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यातला 5,423 किलोमीटर (3,370 मैल) इतका द्वीपकल्पीय भाग भारतात आहे तर उर्वरित 2,094 किलोमीटर (1,301 मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.
💢 मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये 43 टक्के वाळूचे किनारे आहे, 11 टक्के खडकाळ तर उर्वरित 46 टक्के दलदलींनी भरलेला आहे.
💢 बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.
💢 दख्खनच्या पठारावरील महत्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी, कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात.
💢 मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.
💢 पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्यापाण्याचे दलदल आहे त्याला ‘कच्छचे रण’ असे म्हणतात.
💢 गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे.
💢 भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात - दक्षिण अरबी समुद्रातले लक्षद्विप आणि इंडोनेशियाजवळचे अंदमान आणि निकोबार.
What save
ReplyDelete