1) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल?
1) अपसरण चिन्ह 2) स्वल्पविराम 3) अपूर्ण विराम 4) संयोग चिन्ह
उत्तर :- 4
2) पुढील रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा.
भाषेच्या अलंकाराचे ................ हे दोन मुख्य प्रकार आहेत.
1) यमक – अनुप्रास 2) अनन्वय – दृष्टान्त 3) अन्योक्ती – स्वभावोक्ती 4) शब्दालंकार आणि अर्थालंकार
उत्तर :- 4
3) ‘दगडबिगड’ हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे ?
1) अभ्यस्त 2) सामासिक 3) प्रत्ययसाधित 4) यापैकी कोणताही नाही
उत्तर :- 1
4) ‘माझ्या ग घरावरून कुण्या ग राजाचा हत्ती गेला’
वरील विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे ?
1) अभिधा 2) लक्षणा 3) व्यंजना 4) धववाणी
उत्तर :- 3
5) ‘चपला’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
1) जलद 2) कसर 3) पथ 4) वीज
उत्तर :- 4
1) ‘इ, ई’ – या स्वरांची उच्चारस्थाने लिहा.
1) तालव्य 2) मूर्धव्य 3) दन्त्य 4) ओष्ठय
उत्तर :- 1
2) ‘मनोरथ’ या शब्दाचा विग्रह –
1) मन + रथ 2) मनो + रथ 3) मन + ओरथ 4) मन: + रथ
उत्तर :- 4
3) ज्या शब्दाचा लिंग वचन, विभक्ती यानुसार बदल घडून येतो किंवा बदल करता येते त्या शब्दांना ........... असे म्हणतात.
1) विकारी 2) अविकारी 3) दोन्ही 4) दोन्ही नाही
उत्तर :- 1
4) पुढील शब्दातून भाववाचक नाम ओळखा.
1) वकिली 2) गुलाम 3) गायक 4) लबाड
उत्तर :- 1
5) ‘मी स्वत: त्याला पाहिले,’ या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?
1) अनिश्चित 2) संबंधी 3) दर्शक 4) आत्मवाचक
उत्तर :- 4
No comments:
Post a Comment