Sunday, 1 September 2019

27 राज्यांमधल्या वनीकरणासाठी केंद्र सरकारने 47,436 कोटी रूपयांचा निधी दिला.


👉देशाची हरित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि वनीकरणाला चालना देण्यासाठी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी 27 राज्यांना 47,436 कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला. महाराष्ट्राला 3844.24 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

👉वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली योगदान (NDC) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वनीकरणाकरिता हा निधी वापरला जाणार आहे.

👉क्षतिपूरक वनीकरणनिधी व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण (CAMPA) याच्या अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. क्षतिपूरक वनीकरणासाठी गोळा केलेल्या निधीचा राज्यांकडून वापर होत नसल्याच्या सुरुवातीच्या अनुभवानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2001 साली या प्राधिकरणाच्या स्थापनेचे आदेश दिले होते.

👉त्या 27 राज्यांमध्ये ओडिशा, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, पंजाब, आसाम, बिहार, सिक्कीम, मणीपूर, गोवा, पश्चिम बंगाल, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, तामिळनाडू आणि केरळ यांचा समावेश आहे.
                  

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...