🔰देशात यापुढील म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणना प्रक्रियेसाठी खास 'मोबाईल ऍप' विकसित करण्यात येत असून, प्रत्यक्ष जनगणनेत त्याचाही लक्षणीयरित्या वापर करण्यात येईल,' अशी मोठी घोषणा केली.
🔰जनगणना हा कंटाळवाणा सरकारी प्रकार नसून, सरकारच्या कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे ते महत्त्वाचे साधन आहे, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर आधार, पासपोर्ट, बँक खाते, वाहन चालविण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र आदींसाठी एकच 'युनिव्हर्सल कार्ड' वापरणे शक्य आहे,
🔰मोबाईल ऍप सर्व अँड्रॉइड फोनवर उपलब्ध असेल. कागदी प्रक्रियेकडून डिजिटल प्रक्रियेकडे होणारा हा प्रवास आधुनिक, सुटसुटीत व कमी वेळ लागणारा असेल,
राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) देशातील अनेक समस्या संपुष्टात आणण्यास मदत करेल, असे सांगून आसाममध्ये वादात सापडलेल्या या उपक्रमाचे ठाम समर्थन केले.
🔰'देशातील विविध सामाजिक प्रवाह, अखेरच्या पायरीवरील व्यक्तीचा विकास व भविष्यात देशाच्या विकासकार्यासाठीचा जनगणना हा आधार आहे. जनगणनेतूनच 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'सारखी योजना सुरू होते. बालिकांचा जन्मदर कमी असणाऱ्या राज्यांत जनजागृती करणे, गर्भपात कायदे कठोर करणे, यांसारखे अनेक प्रयत्न सुरू झाले. त्याचाही आधार जनगणना हाच आहे. सन 2021 मध्ये होणारी जनगणना ही भारताची 16वी जनगणना असेल. देशाला समस्यामुक्त करण्याचे नियोजन 2014 मध्येच सुरू झाले आहे.'
No comments:
Post a Comment