Tuesday, 24 September 2019

178 वर्ष जुनी ‘थॉमस कुक’ ही ब्रिटिश प्रवासी  कंपनी बंद पडली

👉ब्रिटनची 178 वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक आपला व्यवसाय बंद करत आहे, अशी घोषण कंपनीने केली आहे.

👉आर्थिक संकटात सापडल्यामुळे कंपनीने सध्या व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

👉 कंपनीने सर्व हॉलिडे, फ्लाईट बुकिंग रद्द केले आहेत.

👉व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी 25 कोटी अमेरिकी डॉलरची गरज आहे.

👉थॉमस कुक कंपनी अचानक बंद होणार असल्याने जगभरात फिरायला गेलेले जवळपास 1.50 लक्ष लोक जिथे-तिथे अडकले आहेत.

👉याशिवाय जगभरातली 22 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. यामध्ये 9 हजार कर्मचारी ब्रिटनमधील आहेत.

👉थॉमस कुकची सन 1841 मध्ये स्थापना झाली.

👉 1855 साली कंपनीने पहिली ऐसी ऑपरेटर सुविधा प्रवाशांसाठी सुरु केली, जी ब्रिटिश प्रवाशांना एस्कॉर्ट ट्रिपवर युरोपीयन देशात घेऊन जात होती.

👉त्यानंतर 1866 साली कंपनीने अमेरिका ट्रिप आणि 1872 साली संपूर्ण जगात कंपनीने आपली सेवा सुरु केली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...