Monday, 30 September 2019

मराठी सराव प्रश्न 1/10/2019


१) खालीलपैकी मृदु वर्ण कोणते?
१) क्            २) ग् ३) च् ४) ट्

२) खालीलपैकी अर्धस्वर कोणते?
१) श्, ष् २) स्, ग्           ३) य्, र् ४) ट्, ठ्

३) व्यंजनामध्ये मुख्यमहाप्राण कोणता?
१) ळ् २) ह् ३) क् ४) च्

४) कंठ तालव्य वर्ण कोणते ते ओळखा?
१) य्, र् २) च्, ह् ३) ए, ऐ ४) त्, थ्

५) कठोर वर्ण ओळखा?
१) ग्, घ् २) ड्, ढ् ३) त्, थ् ४) ब्, भ्

६) प्रद्युन्म या शब्दात व्यंजन किती?
१) आठ २) नऊ ३) सात ४) सहा

७) खालीलपैकी कोणते व्यंजन कंठ्य नाही?
१) घ्          २) ह् ३) ख् ४) म

८) 'गौर्यानंद' या शब्दाचा संधी विग्रह करा?
१) गौरी+आनंद २) गौर+आनंद ३) गोरा+आनंद ४) गोर्य+आनंद

९) 'ईश्वर + इच्छा ' या शब्दाचा संधी करा?
१) ईश्वरइच्छा २) ईश्वरेच्छा ३) ईश्वरिच्छा ४) ईश्वरीच्छा

१०) ' मंत्रालय' या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा?
१) मंत्र+आलय   २) मंत्रा+लय ३) मंत्री+आलय ४) मंत्रा+आलय

११) जगत + ईश्वर या विग्रहाची संधी करा?
१) जगतेश्वर २) जगतईश्वर ३) जगदीश्वर ४) जगदेश्वर

१२) 'वाङनिश्चय' या शब्दाची योग्य फोड करा?
१) वाक् + निःश्चय २) वाग + निश्चय ३) वाङ + निश्चय ४) वाक् + निश्चय

१३) मराठीमध्ये कोणत्या पद्धतीने लिहिल्या जाते?
१) डावीकडून उजवीकडे २) उजवीकडून डावीकडे  ३) डावीकडे डावीकडे  ४) यापैकी नाही

१४) गवीश्वरचा योग्य विग्रह ओळखा?
१) गवी + ईश्वर २) गव् + ईश्वर ३) गो + ईश्वर ४) गवी + श्वर

१५) महोत्सव या संधीची फोड करा?
१) महा + उत्सव २) मही +उत्सव ३) महो + त्सव ४) मह + उत्सव

१६) मातृ + छाया या विग्रहाची संधी करा?
१) मातृछाया      २) मात्रोछाया ३) मातृच्छाया ४) मातृउच्छाया

१७) संधी करा षट् + मास
१) षटमास २) षन्मास ३) षण्मास ४) षंमास

१८) निष्पाप या शब्दचा शब्द संधीनुसार तयार झालेला दुसरा शब्द ?
१) सच्छील २) सच्चरित्र ३)दुष्काळ ४) सदाचार

१९) 'अ' किवा 'आ' पुढे 'ए' किंवा 'ऐ' आल्यास दोहोबद्दल ऐ होतो या नियमात न बसणारा शब्द लिहा ?
१) एकैक २) सदैव ३) गंगैध        ४) मतैक्य

२०) मानु + अंतर या विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता?
१) मानवंतर     २) मनुअंतर     ३) मवंतर ४) मन्वंतर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⭕उत्तरे:
१) २, २) ३, ३) २, ४) ३ ,५) ३ ,६) ४ ,७) ४, ८) ४, ९) २ ,१०) ४
११) ४ ,१२) ४ ,१३) १ ,१४) ३, १५) १, १६) ३ ,१७) ३ ,१८) ३ ,
१९) ३ ,२०) १

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...