1) पुढील शब्दसमुहातील ध्वन्यार्थ ओळखा. – ‘हात कापून देणे’
1) मदत करणे 2) लेखी करार करून घेणे
3) धीर सोडणे 4) हात आखडणे
उत्तर :- 2
2) वेगळा अर्थ असलेला शब्द निवडा.
1) सदन 2) कानन 3) भुवन 4) भवन
उत्तर :- 2
3) खालील पर्यायी उत्तरांतील ‘विरुध्दार्थी शब्द’ असलेले पर्याय उत्तर कोणते ?
अ) मित्र I) रवी
ब) अनुज II) अग्रज
क) आदित्य III) सविता
ड) भानू IV) भास्कर
उत्तर :- 2
4) पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा.
काव्यगायनासाठी मित्राला नेल्यावर तो सारखा डुलक्या घेत होता, म्हणतात ना ....................
1) पालथ्या घडयावर पाणी 2) गाढवाला गुळाची चव काय ?
3) पिकते तेथे विकत नाही 4) दुष्काळात तेरावा महिना
उत्तर :- 2
5) ‘निवडणुकीसाठी उभे राहणे’ या वाक्प्रचार कोणत्या भाषेतून मराठीत आला ?
1) इंग्रजी 2) संस्कृत 3) फ्रेंच 4) तुर्की
उत्तर :- 1
6) ‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.
1) सावकारशाही 2) राजेशाही
3) सामंतशाही 4) जमीनदारशाही
उत्तर :- 3
7) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?
1) आध्यात्मिक 2) अध्यात्मिक
3) आध्यात्मीक 4) अधात्मिक
उत्तर :- 1
8) मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे ?
1) क् 2) ण् 3) ळ 4) न्
उत्तर :- 3
9) पुनर् + जन्म हा कोणत्या संधीयुक्त शब्दाचा विग्रह आहे ?
1) पुर्नजन्म 2) पूर्ण जन्म 3) पुनर्जन्म 4) पुनर्जम्न
उत्तर :- 3
10) अचूक विधाने निवडा.
अ) शब्द आणि पद हे एकसारखेच आहे.
ब) शब्दापासून पदे बनतात.
क) पदापासून शब्द बनतात.
1) फक्त अ अचूक 2) फक्त अ आणि क अचूक
3) फक्त ब अचूक 4) फक्त क अचूक
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment