1) ‘कर’ या धातूपासून ‘मी करा’ या एकवचनी पद्यरूपाचे अनेकवचनी रीतिभूतकाळात रुपांतर कसे होईल. बरोबर पर्याय निवडा.
1) आम्ही करू 2) मी करीन
3) मी करून 4) आम्ही करावे
उत्तर :- 1
2) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – पुरणपोळी
1) स्त्रीलिंगी 2) पुल्लिंग
3) नपुंसकलिंगी 4) यापैकी नाही
उत्तर :- 1
3) षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत ?
1) ने, ए, ई, शी 2) ऊन, हून
3) त, ई, आ 4) चा, ची, चे
उत्तर :- 4
4) वाक्याचा प्रकार ओळखा. – ‘सर्वांनी शांत बसा.’
1) संकेतार्थी 2) विध्यर्थी
3) संयुक्त 4) आज्ञार्थी
उत्तर :- 4
5) ‘एके दिवशी युध्द बंद झाल्याची बातमी येऊन धडकली,’ या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ?
1) धडकली 2) युध्द बंद झाल्याची
3) बातमी 4) येऊन, एके दिवशी
उत्तर :- 4
6) पुढीलपैकी मध्यमपदलोपी समास कोणता ?
1) हसतमुख 2) पत्रव्यवहार
3) शोधग्राम 4) गृहसेवा
उत्तर :- 2
7) खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता ते ओळखा.
1) ? 2) !
3) : 4) ;
उत्तर :- 4
8) शब्द बनणे किंवा सिध्द होणे याला काय म्हणतात ?
1) शब्दबंध 2) शब्दार्थ
3) शब्दसाध्य 4) शब्दसिध्दी
उत्तर :- 4
9) दिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा.
‘थंड’
1) गार 2) किनारा
3) आधात 4) गर्दी
उत्तर :- 2
10) ‘विहंग’ या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ :
1) स्त्री 2) पक्षी
3) साप 4) आकाश
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment