Tuesday, 24 September 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे.’ वरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?

   1) सामासिक शब्द    2) अभ्यस्त शब्द   
   3) तत्सम शब्द      4) तद्भव शब्द
उत्तर :- 1

2) योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

   1) सोड, मला ! तो जोराने ओरडला      2) ‘सोड मला’, तो जोराने ओरडला
   3) “सोड मला !” तो जोराने ओरडला    4) “सोड मला”, तो जोराने ओरडला

उत्तर :- 2

3) देशी शब्द शोधा.

   1) धडधड    2) धोंडा     
   3) धाक    4) धोरण

उत्तर :- 2

4) ‘अभिधा शक्तीचे’ उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरांतील कोणते आहे ?

   1) काय गाढव आहे !        2) मला फार भूक लागली
   3) शेजारच्या गावी आम्ही नदीवरून जातो    4) ‘मुलांनो, आता दिवे लागणीची वेळ झाली.’

उत्तर :- 2

5) ‘अचूक’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.

   1) अगम्य    2) नेमका     
   3) अचानक    4) नीट

उत्तर :- 2

6) ‘तो गावोगाव भटकत फिरला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते?

   1) साधित क्रियाविशेषण अव्यय      2) सामासिक क्रियाविशेषण अव्यय
   3) सिध्द क्रियाविशेषण अव्यय      4) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

उत्तर :- 2

7) योग्य शब्दयोगी अव्ययाचा वाक्यात उपयोग करा.

     डोळयांनी .................. पाहून देव दिसत नाही, अंत: चक्षूंनी पहावा लागतो.

   1) सुध्दा    2) फक्त      3) केवळ      4) पण

उत्तर :- 3

8) पण, परंतु, परी, किंतु, तरी हे शब्द उभयान्वयी अव्ययांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय    2) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
   3) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय    4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 3

9) योग्य पर्याय निवडा.

   अ) केवलप्रयोगी अव्यय अविकारी असतात.
   ब) केवलप्रयोगी अव्यये वाक्याचा भाग नसतात.
   1) अ      2) ब      3) दोन्ही      4) दोन्ही नाही

उत्तर :- 3

10) खालीलपैकी रीति भूतकाळाचे वाक्य कोणते ?

   1) तो रोज व्यायाम करत असतो.      2) तो रोज व्यायाम करतो.
   3) तो रोज व्यायाम करत होता.      4) तो रोज व्यायाम करत असे.

उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...