Monday, 30 September 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा.’ नकारार्थी वाक्य बनवा.

   1) ज्येष्ठ नागरिकांचा मान राखा      2) ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करू नका
   3) ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवा    4) ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका

उत्तर :- 4

2) ‘शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो’ या वाक्यातील ‘विधानपूरक’ ओळखा.

   1) शरद    2) चांदणे     
   3) गुलमोहर    4) मोहक 

उत्तर :- 4

3) ‘रामाकडून रावण मारला गेला.’ या प्रयोगाचे नाव सांगा ?

   1) कर्तरी प्रयोग    2) कर्मणी प्रयोग   
   3) भावे प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग
उत्तर :- 2

4) ‘मीठभाकर’ या समाहार व्दंव्द समासाचा विग्रह कसा आहे ?

   1) मीठ किंवा भाकरी      2) मीठ घालून केलेली भाकरी
   3) मीठ, भाकरी व तत्सम पदार्थ    4) भाकरी आणि मीठ

उत्तर :- 3

5) खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. – केवढी शुभवार्ता आणलीस तू

   1) ,      2) .     
   3) ?      4) !

उत्तर :- 4

6) ‘गुळगुळीत’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

   1) रेखीव    2) ओबडधोबड   
   3) पारथर्शी    4) खरखरीत

उत्तर :- 4

7) ‘प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच’ या अर्थाची म्हण ओळखा.
   1) घरोघर मातीच्या चुली      2) जेवीन तर तुपाशी नाही तर उपाशी
   3) चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे  4) गाडयाबरोबर नळयाची यात्रा

उत्तर :- 3

8) ‘आज पाऊस पडावा’ – वाक्यप्रकार ओळखा.

   1) केवल    2) मिश्र     
   3) संयुक्त    4) गौण

उत्तर :- 1

9) ‘दुस-याच्या अंकित असणारा’ – या शब्दसमूहासाठी खाली दिलेल्या शब्द समुहातील लागू पडणा-या शब्दसमूहाचा अचूक पर्याय
      लिहा.

   1) पाताळयंत्री      2) बोकेसंन्यशी   
   3) ताटाखालचे मांजर    4) उंटावरचा शहाणा

उत्तर :- 3

10) शुध्द स्वरूप ओळखा.
   1) पुनजर्न्म    2) पूनर्जन्म   
   3) पुनर्जन्म    4) पूर्नजन्म

उत्तर :- 3

No comments:

Post a Comment