1) रिकाम्या जागी योग्य शब्दाचा वापर करा.
क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांनाच ................... असे म्हणतात.
1) अविकारी क्रियापदे 2) कर्मविषयक अव्यये
3) क्रियाविशेषण अव्यये 4) शब्दयोगी अव्यय
उत्तर :- 3
2) खालील वाक्यांपैकी शब्दयोगी अव्ययाचा उचित प्रयोग असलेले वाक्य ओळखा.
1) देशासाठी प्राण अर्पण करणारे हुतात्मे होत 2) पतंग वर जात होता
3) सूर्य ढगामागे लपला 4) मागे या ठिकाणी विहीर होती
उत्तर :- 3
3) ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ – या वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते ?
1) कीर्ति 2) रूपे 3) परी 4) उरावे
उत्तर :- 3
4) अयोग्य जोडी निवडा.
अ) प्रशंसादर्शक - खाशी, ठीक फक्कड
ब) तिरस्कारदर्शक - शीड, हुडूत, छी
क) संबोधनदर्शक - अगे, अरे, अहो
1) अ 2) ब 3) क 4) यापैकी नाही
उत्तर :- 4
5) खालील वाक्यातील ‘अपूर्ण भविष्यकाळी’ वाक्य कोणते ?
1) आईने देवपूजा केली असेल 2) आई देवपूजा करीत होती
3) आई देवपूजा करीत असेल 4) आई देवपूजा करीत आहे
उत्तर :- 3
6) ‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग कोणते?
1) नपुंसकलिंगी 2) उभयलिंगी 3) स्त्रीलिंगी 4) पुल्लींगी.
उत्तर :- 3
7) गायी – या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
1) बैल 2) गाय 3) गाई 4) कळप
उत्तर :- 2
8) ‘खेळ’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?
1) खेळ 2) खेळे 3) खेळी 4) खेळू
उत्तर :- 1
9) ‘विद्यार्थ्याला बक्षीस दिले’ हे कोणते कारक आहे ?
1) अपादान 2) संप्रदान 3) अधिकरण 4) करण
उत्तर :- 2
10) तरुणांच्या मनात विष का पेरता ! या वाक्याचे आज्ञार्थी रूप कसे होईल ?
1) तरुणांच्या मनात विष ! ते कां पेरता ! 2) तरुणांच्या मनात विष पेरू नका
3) तरुणांची मने विषारी बनतील 4) यापैकी काहीही नाही
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment