1) ‘आता विश्वात्मके देवे’ यात ‘देवे’ शब्दाची विभक्ती कोणती?
1) व्दितीया 2) तृतीया 3) षष्ठी 4) सप्तमी
उत्तर :- 2
2) ‘तू मुंबईला जाणार की नाही ? हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
1) उद्गारार्थी 2) प्रश्नार्थी 3) नकारार्थी 4) संकेतार्थी
उत्तर :- 2
3) ‘अद्यापिही आपण लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही’ या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.
1) अद्यापिही 2) जुन्या चाकोरीच्या बाहेर काढू शकलेलो नाही
3) लोकांना जुन्या चाकोरीच्या बाहेर 4) लोकांना बाहेर काढू शकलेलो नाही
उत्तर :- 2
4) ‘मांजराकडून उंदीर मारला गेला’ – हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?
1) भावकर्तरी प्रयोग 2) भावे प्रयोग
3) कर्मणी प्रयोग 4) कर्म-भाव संकर प्रयोग
उत्तर :- 3
5) ‘दारोदार’ हा कोणता समास आहे ?
1) उपपद तत्पुरुष समास 2) कर्मधारय समास
3) अव्ययीभाव समास 4) नत्र तत्पुरुष समास
उत्तर :- 3
6) ‘अत्यंत’ या शब्दाचा संधीविग्रह –
1) अती + आनंद 2) अत्य + अंत
3) अति + यंत 4) अति + अंत
उत्तर :- 4
7) ज्या नामामुळे पदार्थामधील / प्राण्यामधील गुणाचा अथवा भावाचा अगर धर्माचा बोध होतो त्यास ................ नाम म्हणतात.
1) सामान्य 2) विशेष 3) धातुसाधित 4) भाववाचक
उत्तर :- 4
8) मराठीत प्रमुख सर्वनामे किती ?
1) सात 2) नऊ 3) दहा 4) आठ
उत्तर :- 2
9) योग्य विधान निवडा.
1) विशेषण हे विशेष्याच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलते.
2) विशेषण हे अविकारी आहे.
3) विशेषण हे अव्यय आहे.
4) क्रियाविशेषण हे नामाला लागते.
उत्तर :- 1
10) ‘वादळात झाड सापडले’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
1) अकर्मक क्रियापद 2) सकर्मक क्रियापद
3) अकर्व्हक क्रियापद 4) सहाय्यक क्रियापद
उत्तर :- 1
Very nice 👌 q sir
ReplyDelete