1) खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
1) स, ला, ना, ते 2) चा, ची, चे, च्या
3) त, इ, आ 4) ने, ए, शी, नी
उत्तर :- 2
2) ‘किती उंच पर्वत आहे हा !’ विधानार्थी वाक्य करा.
1) कोण म्हणेल हा पर्वत उंच नाही 2) हा पर्वत लहान थोडाच आहे
3) पर्वत किती उंच आहे ? 4) हा पर्वत खूप उंच आहे
उत्तर :- 4
3) उद्देश्य व विधेय हे ................. चे घटक होत. वरील रिकाम्या जागेत अचूक पर्याय भरा.
1) वाक्या 2) अर्थप्रकाश
3) अर्था 4) वाक्य प्रयोगा
उत्तर :- 1
4) शिपायाकडून चोर पकडला गेला. – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) कर्तरी 2) सकर्मक कर्तरी
3) नवीन कर्मणी 4) भावे
उत्तर :- 3
5) खालील पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ?
‘अव्ययीभाव समासात .............................’
1) पहिले पद प्रुख 2) दुसरे पद प्रमुख
3) दोन्ही पदे प्रमुख 4) तिसरे पद प्रमुख
उत्तर :- 1
6) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – सुनील शाळेला का जात नाही.
1) . 2) ?
3) ! 4) :
उत्तर :- 2
7) ‘कुल’ या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल ?
1) कुळाचार 2) कुळकर्णी
3) कुलटा 4) कुलीन
उत्तर :- 4
8) योग, रूढी, योगरूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत ?
1) अभिधा 2) लक्षणा
3) व्यंजना 4) गौणी
उत्तर :- 1
9) ‘सूर्य’ या अर्थी पुढील शब्द वापरत नाही.
1) रवि 2) आदित्य
3) भानू 4) सुधांशू
उत्तर :- 4
10) विधायक च्या विरुध्द
1) विनायक 2) विघातक
3) वैधानिक 4) संकट
उत्तर :- 2
Chhan English grammar pn taka
ReplyDelete