1) ‘माझा भाऊ आनंदाने रसगुल्ले खातो’ या वाक्यातील उद्देश्यविस्तार ओळखा.
1) रसगुल्ले 2) माझा 3) भाऊ 4) आनंदाने
उत्तर :- 2
2) ‘राणी प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) कर्तरी 2) कर्मणी 3) भावे 4) प्रधानकर्तृक
उत्तर :- 1
3) ज्या सामासिक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते, त्या समासास ............. म्हणतात.
1) तत्पुरुष समास 2) अव्ययीभाव समास 3) बहुव्रीही समास 4) कर्मधारय समास
उत्तर :- 2
4) संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल ?
1) स्वल्पविराम 2) अर्धविराम 3) संयोगचिन्ह 4) अपूर्णविराम
उत्तर :- 1
5) ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळीले सूर्याशी’ अलंकार ओळखा.
1) अतिशयोक्ती 2) व्यतिरेक 3) श्लेष 4) अन्योक्ती
उत्तर :- 1
6) खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही ?
1) पद 2) नयन 3) वडवानल 4) डोळा
उत्तर :- 4
7) उष:काल होता होता, काळरात्र झाली ........... या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो ?
1) वाच्यार्थ 2) शब्दार्थ 3) व्यंगार्थ 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
8) ‘अवडंबर’ म्हणजे –
1) अगडबंब 2) अवघड 3) स्तोम 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
9) ‘चोर चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी त्याला पाहिले’ या वाक्यातील चोर या शब्दाचा विरुध्दार्थी अर्थ असलेला
शब्द निवडा.
1) साधू 2) सन्याशी 3) प्रामाणिक 4) साव
उत्तर :- 4
10) जो वेळेला हजर असतो, त्याचा फायदा होतो – या अर्थाने कोणती म्हण वापरली जाते ?
1) तळे राखील तो पाणी चाखीन 2) साखरेचे खाणार, त्याला दैव देणार
3) पै दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा 4) हाजिर तो वजीर
उत्तर :- 4
No comments:
Post a Comment