Thursday, 8 August 2019

🌹🌳🌴भारताने UNISA या वैश्विक करारनाम्यावर स्वाक्षरी केली🌴🌳🌹

👉दिनांक 7 ऑगस्ट 2019 रोजी सिंगापूर “कन्व्हेंशन ऑन मिडीयेशन” या नावाने ओळखल्या जाणार्‍या ‘मध्यस्थीमधून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय तंटा निवारण करार विषयक संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद’ (UNISA) यावर भारतासह संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या 46 सदस्यांनी सिंगापूरमध्ये स्वाक्षर्‍या केल्या. यावर अमेरीका आणि चीन या देशांनीही स्वाक्षर्‍या केल्या.

👉20 डिसेंबर 2018 रोजी मध्यस्थीमधून तयार झालेल्या आंतरराष्ट्रीय तंटा निवारण करार विषयक संयुक्त राष्ट्रसंघाची परिषद (UN Convention on International Settlement Agreements -UNISA) स्वीकारले गेले.

👉हा वैश्विक करारनामा अंमलात आणण्यासाठी आता केवळ तीन सदस्य देशांच्या स्वाक्षर्‍या हव्या आहेत.

👉या कराराच्या अंमलबजावणीमुळे व्यवसाय करणे अधिकाधीक सुलभ होण्यास मदत होणार.

👉 कॉर्पोरेट क्षेत्रातले तंटे सोडविण्यासाठी मध्यस्थींची गरज ओळखली गेली आहे.

👉2005 साली चेन्नईत भारताचे पहिले मध्यस्थी केंद्र स्थापन केले गेले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...