🎯 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
🎯दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी मोदींनी जे प्रयत्न केले त्यासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.
🎯पंतप्रधान मोदींच्या आधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, क्वीन एलिझाबेथ दुसऱ्या आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
🎯यूएईचे संस्थापक शेख झायेद बिन सुल्तान अल नाहयान यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा पुरस्कार दिला जातो.
🎯या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे शेख झायेद यांच्या जन्म शताब्दी वर्षात मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. यूएईने एप्रिल महिन्यात या पुरस्कारासाठी मोदींच्या नावाची घोषणा केली होती.
🎯आमचे भारताबरोबर ऐतिहासिक आणि व्यापक रणनितीक संबंध आहेत. माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे संबंध बळकट करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असे अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.
🎯 यूएई इस्लामिक देश असला तरी आज पाकिस्तानपेक्षा भारताबरोबर त्यांचे संबंध बळकट आहेत. जम्मू-काश्मीर मुद्दावर जाहीरपणे यूएईने भारताचे समर्थन केले आहे.
🎯जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे हा भारताचा अंतर्गत विषय आहे अशी यूएईची भूमिका आहे.
No comments:
Post a Comment