Friday, 16 August 2019

🌸🌸गृहनिर्माण वित्त कंपन्यांना NBFC कंपन्या गृहीत धरल्या जाणार: वित्त मंत्रालय🌸🌸

✍भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (नॅशनल हाउसिंग बँक -NHB) या संस्थेची जागा घेतली. त्यामुळे ती आता गृहनिर्माण वित्त संस्थांची नियामक संस्था म्हणून काम करणार आहे.

✍13 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी घोषणा केली होती की गृहनिर्माण वित्त कंपन्यांना (HFCs) नियमनाच्या कामकाजासाठी बिगर-बँकिंग वित्त कंपन्यांच्या (NBFCs) श्रेणींमधील एक गृहीत धरले जाणार आणि त्या RBIच्या थेट देखरेखीखाली येतील.

✍त्यासाठी ‘वित्त (क्रमांक 2) कायदा-2019’ (2019 चे 23) याने ‘राष्ट्रीय गृहनिर्माण बँक कायदा-1987’ यामध्ये दुरूस्ती करण्यात आली आहे.

🔴भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) :-

✍भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातली केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 1 जानेवारी 1949 रोजी RBIचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. RBIचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.

✍RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी. डी. देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

No comments:

Post a Comment