Friday, 16 August 2019

🌹🌳🌴ISROचे अध्यक्ष के. सिवन तामिळनाडूकडून कलाम पुरस्काराने सन्मानित🌴🌳🌹

👉15 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) याचे वर्तमान अध्यक्ष कैलाशवडीवू सिवन यांचा तामिळनाडू सरकारने ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार’ देऊन सन्मान केला.

👉 राज्य सरकारने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी सिवन यांचा गौरव केला आहे.

👉तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींना तामिळनाडू सरकारच्यावतीने ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.

👉तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातल्या सराक्कलविलाई गावातल्या एका शेतकरी कुटुंबातले सिवन आज ISROचे अध्यक्षपद सांभाळत आहेत.

👉सिवन यांनी एका सरकारी शाळेतून तमिळ भाषेतून शिक्षण घेतले.

👉सिवन यांनी 1980 साली मद्रास इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेमधून एयरोनॉटिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण घेतले.

👉त्यानंतर IISc बेंगळुरू येथे पुढचे शिक्षण घेतले. 2006 साली IIT बॉम्बेतून पीएचडीची पदवी त्यांनी मिळवली.

👉सिवन 1982 साली ISROमध्ये दाखल झाले.

👉जानेवारी 2018 मध्ये त्यांनी ISROचे नेतृत्व सांभाळले.

👉त्यापूर्वी त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथे प्रत्येक रॉकेट कार्यक्रमावर काम केले.

👉त्यांनी सायक्रोजेनिक इंजिन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉन्च व्हेईकलच्या कार्यक्रमात योगदान दिल्याने सेवल यांना “ISROचे रॉकेट मॅन” म्हणून देखील संबोधले जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...