Wednesday, 21 August 2019

ISRO चे बंगळुरूमध्ये एसएसएएम (SSAM) केंद्र.


● भारतीय अवकाश संशोधन संघटनेने (इस्रो) नुकतीच कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये पिन्या(Peenya) येथे एसएसएएम SSAM (Space Situational Awareness Control Centre) (अंतराळ परिस्थिती जागरूकता नियंत्रण केंद्र) पायाभरणी केली.

◆ उद्देश : अंतराळात पसरलेल्या कचऱ्यापासून भारतीय उपग्रहांचे संरक्षण करणे आहे.

SSAM (Space Situational Awareness Control Centre)

● हे केंद्र भारतीय उपग्रहांना निष्क्रीय उपग्रहांपासून संरक्षण देण्यासाठी खूप प्रभावी ठरेल,तसेच यातून हवामानाविषयी माहिती सुद्धा दिली जाईल.

● हे केंद्र निष्क्रिय उपग्रहांविषयी डेटा संकलित करेल. यामुळे अवकाशात पसरलेला कचरा काढून टाकण्यास मदत मिळेल.

● सध्या इस्रोकडे जवळपास 50 उपग्रह कार्यरत आहेत, हे उपग्रह संप्रेषण, नेव्हिगेशन आणि निगराणीसाठी वापरले जातात.

● याआधी इस्रो, अवकाशात पसरलेल्या कचऱ्याशी संबंधित माहिती व देखरेखीसाठी उत्तर अमेरिका एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) वर अवलंबून होते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था

● 1962 ला (Indian National Committee for Space Research (INCOSPAR))भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना अणूऊर्जा विभागातंर्गत केली.

● 1969 मध्ये INCOSPAR चे रूपांतर ISRO मध्ये केले गेले.

● 1972 मध्ये भारत सरकारने 'अंतराळ आयोग' आणि 'अंतराळ विभाग' तयार केला व इस्रो हे अंतरिक्ष विभागाच्या(DOS) नियंत्रणाखाली आले.

● इस्रोची व्यावसायिक शाखा: अँट्रिक्स.

● भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) व्यावसायिक विभाग असलेल्या 'अँट्रिक्स कॉर्पोरेशन'ने मागील तीन वर्षांत 239 उपग्रह प्रक्षेपित केले आणि यातून सुमारे 6289 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

● सरकारने ६ मार्चला अंतराळ विभागाच्या (डीओएस) प्रशासकीय नियंत्रणाखाली न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) या कंपनीची स्थापना केली आहे.याद्वारे 'इस्रो'ची केंद्र आणि अंतराळ विभागाच्या शाखांतील संशोधन आणि विकासाला व्यावसायिकदृष्ट्या चालना देण्यात येणार आहे.

● इसरो चेअरमन: के सिवन.(15 जानेवारी 2018 पासून)

स्रोत: THE HINDU, ISRO OFFICIAL WEBSITE, महाराष्ट्र टाइम्स.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...