✍विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ बायसन विमान आकाशात झेपावल्यानंतर त्यांच्याबरोबर माझा संवाद चालू होता.
✍बालाकोट एअर स्ट्राइक आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी फायटर विमानांबरोबरच्या डॉगफाइटमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आयएएफच्या स्क्वाड्रन लीडर मिंटी अग्रवाल यांना युद्ध सेवा मेडल पुरस्कार जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानी फायटर विमाने भारतात घुसली होती.
✍त्यावेळी झालेल्या डॉगफाइटमध्ये मिंटी यांनी वॉर रुममधून विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना मार्गदर्शन केले होते. युद्धाच्या काळातील उल्लेखनीय कामगिरीसाठी युद्ध सेवा मेडल या पुरस्काराने सन्मानित केले जाते..
✍मिंटी अग्रवाल या त्या टीममध्ये होत्या. पाकिस्तानी फायटर विमानांना रोखण्यासाठी आकाशात झेपावलेल्या इंडियन एअर फोर्सच्या फायटर विमानांच्या त्या कंट्रोलर होत्या.
No comments:
Post a Comment