भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) विकसित केलेल्या मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) भारतीय सैन्याकडे सुपूर्द केले. 70 मेट्रिक टन (MT) एवढा भार सहन करू शकणार्या MMRची रचना व विकास DRDOच्या एका केंद्राने केला.
मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) हा पूलाचा एक प्रकार आहे, जो गाडीच्या मदतीने कुठेही सोबत घेवून जाता येतो. या यंत्रणेमुळे सैन्याच्या सशस्त्र वाहनांच्या चळवळीला लागणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.
✍DRDO विषयी
संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारताच्या संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी समर्पित असलेली प्रमुख संस्था आहे. त्याची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही संस्था भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे.
No comments:
Post a Comment