Thursday, 1 August 2019

Current affairs

📌 NASAची प्रथम महिला अंतराळवीर जेरी कॉब यांचे निधन

अमेरिकेची नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संस्थेची प्रथम महिला अंतराळवीर ठरलेली जेरी कॉब यांचे दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या.

जेरी कॉब ह्या 1961 साली अंतराळवीर बनण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण करणार्‍या प्रथम महिला होत्या.

कॉब ह्यांनी अनेक दशके अॅमेझोनच्या जंगलामध्ये मदत पोहचविण्यासाठी विमानचालक म्हणून काम केले होते.

मुस्लिम महिला अधिकार संरक्षण(तिहेरी तलाक) विधेयक 2018

• लोकसभेत 303  विरुद्ध 82 मतांनी मंजूर (25 जुलै 2019)

• राज्यसभेत 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर (30 जुलै 2019)

✅ कायद्यातील तरतुदी

1. पतीस 3 वर्ष कैद व दंड
2. तलाकपीडित स्त्री व अपत्यांसाठी निर्वाह भत्यास पात्र
3. खटला तडजोडीने मिटवणे शक्य
4. 19 सप्टेंबर 2018 पासून जम्मू अँड काश्मीर वगळता भारतभर लागू
5. गुन्हा अजामीनपात्र मात्र, दंडाधिकारी जामीन देऊ शकणार

सीएट इंटरनॅशनल क्रिकेट पुरस्कार 2019:-

● जीवनगौरव पुरस्कार – मोहिंदर अमरनाथ
● आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम फलंदाज – विराट कोहली
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम गोलंदाज – जसप्रीत बुमराह
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम कसोटीपटू – चेतेश्वर पुजारा
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू – रोहित शर्मा
● आंतरराष्ट्रीय टी-२० सर्वोत्तम क्रिकेटपटू – ऍरॉन फिंच
● उल्लेखनीय कामगिरी – कुलदीप यादव
● आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम टी २० गोलंदाज – रशीद खान
● देशांतर्गत सर्वोत्तम खेळाडू – आशुतोष अमन
●आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू – स्मृती मंधाना
● सर्वोत्तम युवा (कनिष्ठ) क्रिकेटपटू – यशस्वी जैस्वाल
● क्रिकेट पत्रकारिता पुरस्कार – श्रीराम वीरा आणि स्नेहल प्रधान
● विशेष मानवंदना – स्व. अजित वाडेकर

आशियाई विकास बँक (ADB) #Bank
ही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली. मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे.

“फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. याचे 67 देश सदस्य आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...