Monday, 19 August 2019

महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेनापदक

✍शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना सेनापदक दिलं जाणार आहे.

✍उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आलं.

✍त्यांच्या शौर्याचा गौरव मरणोत्तर सेना पदक देऊन केला जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच ही घटना घडली होती.

✍कौस्तुभ राणे यांना मागच्याच वर्षी नियंत्रण रेषेजवळ केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देण्यात आले होते.

✍तसेच त्यांना मेजर हा हुद्दा देऊन लष्करात बढतीही देण्यात आली होती. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना ते शहीद झाले.

✍मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या वैभववाडी येथील सडुरे गावचे राणे कुटुंब १९९० मध्ये मीरा रोडच्या शीतलनगर येथील हिरल सागर या इमारतीत रहायला आले.

✍कौस्तुभचे शालेय शिक्षण मीरा रोडच्या होली क्रॉस शाळेत झाले.

✍लहानपणापासूनच अतिशय हुशार असलेल्या कौस्तुभने शालेय जीवनातच सैन्यात जायचे नक्की केले होते.

✍लष्करी शिक्षण पुण्यात पूर्ण केल्यानंतर २०१० मध्ये त्यांनी कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली आणि चेन्नई येथे अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केले.

✍ऑक्टोबर २०११ मध्ये लेफ्टनंट या पदावर ते लष्करी सेवेत रुजू झाले. २०१३ मध्ये त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली आणि २०१८ मध्ये मेजर पदावर कार्यरत होते.

✍मात्र दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आले.

✍कौस्तुभ यांचे वडील खासगी कंपनीत नोकरीला होते, सध्या ते निवृत्त झाले आहेत. त्यांची आई निवृत्त शिक्षिका आहेत.

✍काश्मीरमध्ये बदली होण्याआधी ते कोलकाता येथे आपल्या पत्नीसह रहात होते.

✍मात्र काश्मीरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपली पत्नी आणि मुलाला आई वडिलांकडे मीरारोडला रहायला पाठवले होते.

✍एप्रिल २०१८ मध्येच त्यांनी कुटुंबाची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर बातमी आली ती त्यांच्या जाण्याचीच. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते. 

✍त्यांच्या शौर्याचा गौरव सेना पदक देऊन केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...