Sunday, 25 August 2019

आता प्लास्टिकमुक्त अभियान, मोदींची घोषणा

◼️ स्वच्छ भारत अभियानानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 'प्लास्टिकमुक्त अभियान' सुरू करण्याची घोषणा केलीय. येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची १५०वी जयंती आहे. यानिमित्ताने देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबण्यात येणार आहे. '

◼️महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून देशभरात प्लास्टिकमुक्त अभियान राबवणार

◼️नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा आणि अभियानात सहभागी व्हावे

◼️संपूर्ण सप्टेंबर महिना 'पोषण अभियान' म्हणून राबवणार

◼️‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान ११ सप्टेंबरपासून राबवण्यात येईल

◼️दरवर्षी आपण २९ ऑगस्टला 'राष्ट्रीय क्रीडा दिन' साजरा करतो. यानिमित्ताने आपण 'फिट इंडिया मूव्हमेंट' म्हणजे 'तंदुरुस्त भारत अभियान' सुरू करणार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. जागृकतेअभावी कुपोषणाची समस्य गरीबांसह सधन कुटुंबांमध्येही दिसून आली आहे. यामुळे संपूर्ण सप्टेंबर महिना 'पोषण अभियान' म्हणून राबवला जाईल. नागरिकांनी यात सहभागी व्हावं आणि आल्यापरिने योग्य ते सहकार्य करावं, असं आवाहन मोदींनी जनतेला केलंय.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...