◼️फ्रँकफर्ट(जर्मनी): क्रिकेट, बॕडमिंटन, टेनिस, हॉकी व टेबल टेनिसपाठोपाठ भारतीय खेळाडू अलीकडे वेगवेगळ्या खेळांमध्ये यश मिळवू लागले आहेत. स्क्वॕश, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलपाठोपाठ आता सायकलिंगमध्ये भारतीय सायकलिंगपटूंनी आपली मोहोर उमटवली आहे. ज्युनियर गटाच्या ट्रॕक सायकलिंग विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक तर एस्बो अल्बेन याने कास्यपदक जिंकले आहे.
◼️सायकलिंगच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सिनियर असो वा ज्युनियर, कोणत्याही गटात मिळालेले हे पहिलेच सुवर्ण पदक आहे. एस्बो अल्बेन, एल. रोनाल्डो सिंग, वाय रोहित सिंगा आणि जेम्स सिंग यांच्या संघाने ही ऐतिहासिक कामगिरी बजावली.
◼️एस्बो अल्बेन याने अपेक्षेनुरूप कामगिरी करताना पुरुषांच्या किरीन प्रकाराचे कांस्यपदक जिंकले.
◼️पुरुषांच्या सांघिक स्प्रिंटमध्ये पहिल्या फेरीत भारतीय संघाने 44.764 सेकंदाची सर्वात जलद वेळ नोंदवली. त्यांनी चीनपेक्षाही (46.248 सेकंद) सरस वेळ नोंदवली.
◼️अंतिम फेरीत भारतीय चमूची स्पर्धा अॉस्ट्रेलियाशी होती. अॉस्ट्रेलियन त्रिकुट पहिल्या दोन लॕपनंतर आघाडीवर होते परंतु भारतीय चमूने आपल्या दुसऱ्या आणि अंतिम लॕपमध्ये 12.915 सेकंदाची वेळ नोंदवत केवळ 0.056 सेकंदाच्या फरकाने सुवर्ण पदक जिंकले. भारताची विजयी वेळ 44.625 सेकंदाची राहिली.
◼️पुरुषांच्या किरीन स्पर्धेत एस्को तिसऱ्या स्थानी आला. या गटात ग्रीसच्या काँन्स्टॕन्टिनोस लिव्हानोसने सुवर्ण तर अॉस्ट्रेलियाच्या सॕम गॕलाघेर याने रौप्यपदक जिंकले.
◼️सद्यस्थितीत स्प्रिंट व किरिन या सायकलिंगच्या प्रकारांमध्ये एस्को ज्युनियर गटातील टॉपचा सायकलपटू आहे. अंदमान व निकोबारचा हा सायकलपटू गेल्या वर्षी ज्युनियर ट्रॕक सायकलिंगच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय सायकलपटू ठरला होता. त्यावेळी त्याने किरिन प्रकारात रौप्यपदक जिंकले होते.
No comments:
Post a Comment