Monday, 15 November 2021

जगातल्या या तीन देशांवर भारत आहे सर्वाधिक अवलंबून


▪️कुठल्याही देशाला जगात महासत्ता म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्याचे जगातील इतर देशांसोबतचे संबंध चांगले असणे अत्यंत महत्वाचे असते.
______________________________________

1] रशिया : गेल्या ७० वर्षांहून आदिक काळापासून भारत आणि रशियाचे राजकीय संबंध आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ज्या देशावर सर्वाधिक अवलंबून आहे, त्यात रशियाचा पहिला क्रमांक लागतो.

शीतयुद्धाच्या काळापासून भारत आणि रशियात मजबूत राजकीय, सामरिक आणि सुरक्षाविषयक संबंध राहिलेले आहेत.

भारत आणि रशियाने एकमेकांना अडचणीच्या काळात नेहमीच मदत केली आहे. भारत जगात सर्वाधिक शस्त्रखरेदी रशियाकडून करतो. भारताचा सर्वाधिक व्यापार रशिया देशासोबत होतो.
______________________________________

2] जपान : जपान हा देश त्यांच्या तंत्रज्ञानासाठी जगात प्रसिद्ध आहे. पण त्याच्या पूर्वीपासून भारत आणि जपानमध्ये सौहार्दाचे संबंध आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या काळात जपानने भारताला केलेली मदत, भारत-चीन सीमाप्रश्नी जपानची मिळणारी मदत, तसेच भारतातील बौद्ध धर्माचा जपान देशावर असणारा प्रभाव असे अनेक घटक त्यामागे आहेत.

जपान हा जगातील दुसरा असा देश आहे ज्यावर भारत भारतीय सर्वाधिक अवलंबून आहे.

✅ जपानमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी भारताच्या विकासात योगदान दिले आहे. सोनी, टोयोटा, होंडा, सुझुकी, हिरो होंडा, इत्यादि. भारतातील अनेक प्रकल्पांमध्ये जपानची मदत झाली आहे, दिल्ली मेट्रोचे काम त्यापैकी एक प्रमुख
______________________________________

3] सौदी अरेबिया : सौदी अरेबिया हा जगातील तिसरा असा प्रमुख देश आहे ज्यावर भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक अवलंबून आहे.

✅ भारताच्या तेल आणि वायूऊर्जेची ३५% गरज एकटा सौदी अरेबिया भागवतो. व्यापारी संबंधांसोबतच भारताचे सौदी अरेबियासोबत सुरक्षाविषयक संबंधही आहेत.

हे दोन्ही देश एकमेकांना संकटाच्या काळात मदत करतात. सौदी अरेबियातील मक्काच्या हज यात्रेला दरवर्षी हजारो भारतीय मुस्लिम जात असतात. सौदी अरेबियात हजारो भारतीय लोक नोकरी, व्यवसाय करतात.
______________________________________

______________________________________

1 comment:

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...