◼️ ईडी म्हणजे Enforcement Directorate च संक्षिप्त रूप ज्याला मराठी मध्ये अंमलबजावणी संचालनालय म्हटलं जातं.
◼️ कायद्याचं उत्तम जाण असणारे निडर कार्यक्षम सनदी अधिकारी ईडी मध्ये नियुक्त केले जातात.
◼️भारतामध्ये आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी तसेच आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करणारी यंत्रणा आहे. ही अर्थ मंत्रालयातील राजस्व विभागाचा एक भाग आहे. यात भारतीय महसूल सेवेतील अधिकारी काम करतात.
◼️परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा तपास करण्यासाठी भारत सरकारने १ जून २००० रोजी याची स्थापना केली.
◼️पण त्यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना १ मे १९५६ रोजी करण्यात आली. भारतात आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली.
◼️ ही देशात आर्थिक कायद्याचं व्यवस्थापन करणारी संस्था आहे. अंमलबजावणी संचालनालय ही संस्था अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत येते.
◼️भारत सरकारच्या १९४७ च्या कायद्याअंतर्गत ईडीची स्थापना करण्यात आली होती. १९५६ ला स्थापनेच्या वेळी ईडीला ईयू (एनफोर्समेंट यूनिट) म्हणून ओळखलं जायचं. पण १९५७ ला त्याचं नाव बदलून ईडी (एनफोर्समेंट डायरेक्टरेट) असं करण्यात आलं.
◼️ही एक इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते. तिचा मुख्य उद्देश भारत सरकारच्या दोन प्रमुख कायद्यांची अंमलबजावणी करणे आहे. हे दोन कायदे आहेत "परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम १९९९" व "अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध, २००२".
◼️सर्वप्रथम फेरा (Foreign Exchange Regulation Act) १९४७ च्या कायद्यानुसार ईडीची स्थापना झाली. त्यानंतर या कायद्यात बदल करून फेरा १९७३ आला. आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे फेरा १९७३ च्या नियामक कायद्यात थोडाफार बदल करण्यात आला. त्याच्या जागी १ जून २००० ला फेमा (FEMA) १९९९ हा कायदा लागू करण्यात आला.
◼️विदेशी संपत्ती नियमन कायदा (पीएमएलए २००२) (Prevention of Money Laundering Act 2002) हा नवा कायदा लागू करून अंमलबजावणी संचालनालयाकडे जबाबदारी देण्यात आली.
🔳ईडी चे कार्यालय व केंद्र🔳
◼️नवी दिल्ली इथं अंमलबजावणी संचालनालयाचं मुख्यालय आहे. इथं संचालक कार्यरत असतात. त्या शिवाय मुंबई, चेन्नई, चंदीगढ आणि कोलकाता आणि दिल्ली याठिकाणी विभागीय कार्यालय आहेत. इथं विशेष संचालक काम पाहतात. यांच्या खाली अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगढ, चेन्नई, कोच्ची, दिल्ली, पणजी, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जालंधर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पटना आणि श्रीनगर या शहरांत क्षेत्रीय कार्यालय आहेत. याठिकाणी संयुक्त संचालक काम पाहतात.
◼️उपक्षेत्रीय कार्यालय भुवनेश्वर, कोझिकोडे, इंदूर, मदुरै, नागपूर, इलाहाबाद, रायपूर, देहरादून, रांची, सुरत, शिमला, विशाखापट्टणम आणि जम्मू इथं उपक्षेत्रीय कार्यालय आहेत. इथं उप संचालक कार्यरत असतात. सध्या संजयकुमार मिश्रा अंमलबजावणी संचालक म्हणून काम पाहत आहेत.
🔘 ईडीचे कार्य 🔘
◼️१९९९ च्या फेमा उल्लंघनाशी संबंधित माहिती संकलित करणे, विकसित करणे आणि प्रचार करणे. केंद्रीय व राज्य गुप्तहेर संस्था, तक्रारी इ. सारख्या विविध स्त्रोतांकडून गुप्त पध्दतीने कोणती गुंतवणूक केली गेली आहे का ते तपासणे.
◼️फेमाच्या संशयास्पद उल्लंघनाच्या तरतुदींचे परीक्षण करणे, जसे की "हवाला" परकीय चलन रॅकेटिंग, निर्यात प्रक्रिया पूर्ण न करणे, परकीय चलन परत न करणे किंवा अंतर्गत इतर प्रकारच्या उल्लंघनांचे प्रकार तपासणे.
No comments:
Post a Comment