Saturday, 24 August 2019

पूरपरिस्थितीच्या अभ्यासासाठी जलसंपदातर्फे दहा जणांची समिती


👉भीमा व कृष्णा नदीच्या खोर्‍यामध्ये आलेल्या महापुराची कारणे शोधण्यासाठी व त्यावर उपायोजनात्मक अहवाल तयार करण्याकरिता जलसंपदा विभागाच्या वतीने दहा जणांची अभ्यास समिती स्थापन केली आहे.

👉जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

👉दहा सदस्यीय समितीने तीन महिन्यात अहवाल द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

👉जास्तीत तीन महिन्यात म्हणजे 30 नोव्हेंबरपर्यंत अहवाल द्यावा.

👉यावर्षीच्या पावसाळ्यात कृष्णा नदीच्या खोर्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील गावे मोठ्या संख्येने बाधित झाली. त्याचप्रमाणे जीवित व वित्त हानीदेखील प्रचंड झाली.

👉पुराच्या कारणांबाबत विविध स्तरांवरून मतमतांतर व्यक्त होत आहेत. चालूवर्षीची पूरपरिस्थिती अधिकच गंभीर आहे.

👉अलमट्टी धरण तसेच दोन्ही राज्यांतील अन्य प्रकल्पही पूर्णत्वास आलेले आहेत. यात अनेक तांत्रिक गुंतागुंतीच्या बाबी आहेत. या सर्व बाबींचे सखोल तांत्रिक अन्वेषण करून पूरपरिस्थितीची कारणे शोधणे, भविष्यात अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना आखण्याकरिता तज्ज्ञ अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे.

👉त्यामध्ये भारतीय हवामान खाते, भारतीय प्राद्योगिक संस्था (आयआयटी), महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, जलक्षेत्रातील विश्लेषक अशा तज्ज्ञांचा समावेश आहे.

✅नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये समावेश करण्यात आलेल्यांची नावे पुढील प्रमाणे :

👉विनय कुलकर्णी (तांत्रिक सदस्य, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण),

👉संजय घाणेकर (सचिव, प्रकल्प समन्वयक, जलसंपदा विभाग)

👉प्रा. रवी सिन्हा (आयआयटी, मुंबई),

👉नित्यानंद रॉय (मुख्य अभियंता, केंद्रीय जलआयोग, नवी दिल्ली),

👉संचालक, महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोजिता केंद्र, नागपूर,

👉उपमहासंचालक, भारतीय हवामान विभाग,

👉संचालक, आय. आय. टी. एम. पुणे,

👉प्रदीप पुरंदरे (सामाजिक कार्यकर्ते व तज्ज्ञ),

👉राजेंद्र पवार (सचिव, जलसंपदा विभाग, मुंबई)

No comments:

Post a Comment