Thursday, 27 January 2022

जाणून घेऊया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जलविषयक भूमिका....


● डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्‍पकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत.

● कायदा, समाजशास्‍त्र, मानववंशशास्‍त्र आणि राज्‍यशास्‍त्र अशा अनेक क्षेत्रांत त्‍यांनी बहुमोल कामगिरी बजावली आहे.

● देशाच्‍या आर्थिक आणि जलधोरणातही त्‍यांची मोठी भूमिका आहे.

● देशाची जलनीती, दामोदर  खोरे प्रकल्‍प, हिराकुंड धरण, सोननदी प्रकल्‍प कार्यान्वित करण्‍यासाठी त्‍यांचे योगदान उल्‍लेखनीय व महत्त्वपूर्ण आहे.

● सध्‍याच्‍या राष्‍ट्रीय नदीजोड प्रकल्‍पाची कल्‍पना बाबासाहेबांनी 1942 ते 1945 दरम्‍यान मांडली होती.

● 20 जुलै, 1942 रोजी डॉ.आंबेडकरांनी मजूर मंत्री म्‍हणून सूत्रे हाती घेतली.

● त्‍यांचा व्‍हॉइसरॉय कार्यकारी मंडळाचे सभासद म्‍हणून समावेश करण्‍यात आला आणि त्‍यांच्‍याकडे श्रम, सिंचन व वीज हे विभाग सोपवण्‍यात आले.

● दुसऱ्या महायुध्‍दानंतरचे व्‍यापक आर्थिक विकासाचे धेरण आणि सिंचन व वीज या विषयावर तपशीलवार धोरण तयार करण्‍यासाठी बाबासाहेबांनी पुढाकार घेतला.

● 1935च्‍या कायद्यानुसार श्रम विभागाने सिंचन आणि वीज विकासासाठी मुख्‍यत्‍वे तीन गोष्‍टी कार्यान्वित करण्‍याचे ठरवले.

● त्‍यामध्‍ये
१) एकापेक्षा दोन राज्‍यांत वाहणाऱ्या नद्यांचे नियंत्रण व व्‍यवस्‍थापन करणे.
२)राज्‍यांमधील नद्यांवर पाणी व जल विद्युत उर्जा संपत्‍ती निश्चित करणे
३)शासकीय व तांत्रिक विकास करण्‍यासाठी राष्‍ट्रीय सिंचन धोरण काय असावे या गोष्‍टींचा समावेश होता.

● पाण्‍यासंबंधी घटनात्‍मक तरतुदी
डॉ. आंबेडकरांनी घटनेचा आराखडा घटना समितीस सादर करताना पाणी हा विषय केंद्र शासनाच्‍या अख्‍त्‍यारीत असावा, अशी भूमिका मांडली.

● भारतीय राज्‍यघटनेत पाणी हा विषय क्रमांक 56 मध्‍ये अंतर्भूत होऊन केंद्र शासनालाही यासंबंधी कायदे करण्‍याचे अधिकार प्राप्‍त झाले.

● भारताच्‍या राज्‍यघटनेत ही तरतूद कलम २६२ मध्‍ये समाविष्‍ट करण्‍यात आली आहे.

● कलम २६२ अंतर्गत 'आंतरराज्‍यीय जल‍विवाद कायदा' व 'नदीखोर प्राधिकरण कायदा 1956' पारित करण्‍यात आला.  

● पुराच्‍या पाण्‍याचा विनियोग करा
नोव्‍हेंबर 1945 मध्‍ये कटक येथे झालेल्‍या परिषदेत डॉ. आंबेडकरांनी अत्‍यंत मौलिक विचार देशाला दिले आहेत.

● 'पाणी आणि महापूर हे विनाशकारी आहेत, असे गृहीत धरु नका. देशामध्‍ये एवढे पाणी उपलब्‍धच नाही की जे हा‍निकारक ठरु शकेल.

● भारतीय जनतेला पाण्‍याच्‍या कमतरतेमुळे जास्‍ट कष्‍ट सोसावे लागतात, जास्‍त पाण्‍याच्‍या उपलब्‍धतेमुळे नाही.

● पाणी राष्‍ट्रीय संपदा असल्‍यामुळे आणि पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्‍याचे प्रमाण असमतोल आणि अविश्‍वासार्ह असल्‍यामुळे पुराच्‍या जास्‍त पाण्‍याविषयी तक्रार करण्‍यापेक्षा या पुराच्‍या पाण्‍याचा मनुष्‍याच्‍या विकासासाठी धरणे बांधून कसा उपयोग करता येर्इल, हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे.

● त्‍यासाठी जेथे पुरामुळे नेहमी नुकसान होत असते त्‍या नद्यांवर ठिकठिकाणी धरणे बांधून हे पाणी समुद्राला जाऊ न देता विकासासाठी वापरणेच इष्‍ट ठरेल.' असे विचार त्‍यांनी मांडले होते.

● हिरांकुड धरण प्रकल्‍प
केंद्रीय जलमार्ग, पाटबंधारे, नौकायन आयोगाचे अध्‍यक्ष ए.एन. खोसला यांनी महानदीवरील बहुद्देशीय विकास प्रस्‍तावावर डॉ. आंबेडकरांशी चर्चा करुन हिराकुंड धरणाची अंमलबजावणी केली.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...