Friday, 16 August 2019

🌹🌳🌴मुंबईत कौशल्य विकास केंद्र उभारण्यासाठी सरकारची टाटा ट्रस्टसोबत भागीदारी🌴🌳

👉14 ऑगस्ट 2019 रोजी घोषणा केल्याप्रमाणे, भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाने टाटा ट्रस्टसोबत एक भागीदारी करार केला आहे, ज्यामधून मुंबईत 300 कोटी रुपये खर्चून एक आधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र उभारण्याची योजना आहे.

👉करारानुसार केंद्र सरकार मध्य मुंबईत सायन येथे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेच्या (NSTI) परिसरात चार एकरचा भूखंड उपलब्ध करून देणार आहे, तर टाटा ट्रस्ट त्यावर 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक जागतिक दर्जाचे केंद्र उभारणार आणि त्याचे संचालन करणार.

👉योजनेनुसार, संस्था सिंगापूर आणि जर्मनी या देशांमधील आंतरराष्ट्रीय मानदंडांना अनुसरून उभारली जाणार. संस्थेत 10 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाऊ शकणार.

👉संस्थेमध्ये प्रगत तंत्रज्ञानावर भर दिला जाणार असून त्यात फॅक्टरी ऑटोमेशन, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, सायबर सुरक्षा, अ‍ॅडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स, डिजिटल डिझाईन, स्मार्ट मेकाट्रॉनिक्स अश्या विषयांमधले प्रगत कौशल्य उपलब्ध असणार.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...