Monday, 26 August 2019

पृथ्वीजवळून आज जाणार १०२ मजली इमारतीइतका लघुग्रह


◾️ अमेरिकेतील 102 मजली ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’ इतक्या आकाराचा लघुग्रह शनिवारी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्याला ‘2006 क्यूक्यू 23’ असे नाव देण्यात आले आहे. 1870 फूट व्यास असलेल्या या लघुग्रहाची उंची 1454 फूट इतकी आहे. तो ताशी 16,740 कि.मी. वेगाने पृथ्वीजवळून जाईल.

पृथ्वीच्या तुलनेने अधिक जवळून जात असल्याने त्याच्याकडे सुरुवातीपासूनच बारकाईने नजर ठेवली जात आहे. ‘नासा’च्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिसच्या लिंडले जॉन्सन आणि केली फास्ट यांनी सांगितले की, हा लघुग्रह जवळून जात असला तरी पृथ्वीला धडकण्याचा धोका नाही. तो 50 लाख मैल अंतरावरून पुढे निघून जाईल.

पृथ्वीच्या जवळपास एक किलोमीटरपेक्षाही अधिक मोठ्या आकाराचे असे सुमारे 900 लघुग्रह आहेत. ते या ‘2006 क्यूक्यू 3’ पेक्षाही मोठ्या आकाराचे आहेत. पुढील शंभर वर्षांच्या काळात तरी पृथ्वीला लघुग्रहाची धडक होण्याचा धोका संभवत नाही.

No comments:

Post a Comment