Tuesday, 20 August 2019

पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुटानमध्ये मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन

​​

        मांगदेछू जलविद्युत प्रकल्प

🗣पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुटानमध्ये उभारण्यात आलेल्या 10 हजार मेगावॉट क्षमतेच्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

🗣4500 कोटी रूपयांचा हा जलविद्युत प्रकल्प मध्य भुटानच्या ट्रोंगासा झोंगखाग जिल्ह्यात मांगदेछू नदीवर बांधण्यात आला आहे. प्रारंभी 720 मेगावॉटच्या क्षमतेसह प्रकल्प चालवला जाणार आहे. 2020 सालापर्यंत प्रकल्पाची पूर्ण क्षमता प्राप्त करण्याची योजना आहे.

🗣मांगदेछू जलविद्युत प्रकल्प हा भुटान-भारत मैत्री प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. हा भुटानमधल्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकारकडून तांत्रिक आणि वित्तपुरवठा करण्यात येत आहे. बांधकाम खर्चाच्या 70 टक्के कर्जस्वरुपात तर 30 टक्के अनुदान अश्या स्वरुपात भारताकडून वित्तपुरवठा केला जात आहे.

🗣भुटान हा हिमालयाच्या पूर्व भागात असलेला बौद्ध साम्राज्य असलेला देश आहे. थिंपू हे या देशाचे राजधानी शहर आहे. भारतीय रुपया, भुटानी नगुल्ट्रम ही चलने देशात वापरली जातात. झोंगखा ही देशाची अधिकृत भाषा आहे.

No comments:

Post a Comment