👇👇👇👇👇👇👇👇👇👇
✍बऱ्याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल होतात.
✍आरबीआयने बँकांना फटकारले असून एटीएम ट्रांझेक्शन लिमिटच्या नावाखाली ग्राहकांना लुटण्याच्या प्रकारावर चाप लावला आहे.
✍बँकांकडून महिन्याला केवळ 5 ट्रान्झेक्शन मोफत दिली जात होती. यानंतर प्रत्येक ट्रान्झेक्शनला 20 ते 25 रुपयांचे शुल्क आकारले जात होते.
✍बऱ्याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल होतात. ही ट्रान्झेक्शनही बँका पहिल्या 5 ट्रान्झेक्शनमध्ये धरत होत्या. यामुळे पुढील एटीएम ट्रान्झेक्शनवर बँका शुल्क आकारत होत्या. यामुळे ग्राहकांची लूट होत होती.
✍तांत्रिक गोष्टी किंवा एटीएममध्ये पैसे नसल्याने ट्रान्झेक्शन फेल झाल्यास मोफत ट्रान्झेक्शनमध्ये मोजू नये. तसेच नॉन कॅश ट्रान्झेक्शनही या श्रेणीमध्ये पकडू नये अशा सूचना आरबीआयने बँकांना दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment