Tuesday, 15 February 2022

महाराष्ट्रातील समाज सुधारक : डॉ पंजाबराव देशमुख

🔘 जीवन परिचय 🔘

⚫️ डॉ पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापळ  या गावी एका मराठा शेतकरी कुटुंबात झाला.वडिलांचे श्यामराव व आईचे नाव राधाबाई होते.त्यांचे आडनाव कदम  असे होते. वतनदारीमुळे त्यांना देशमुख हे नाव पडले.

⚫️ पंजाब्रावाचे प्राथमिक शिक्षण पापळ येथेच झाले.अमरावतीच्या हायस्कूलमधून १९१८ साली म्याट्रिकची परीक्षा पास झाले.पंजाबराव उच्च शिक्षणासाठी पुण्यास गेले.तेथे त्यांनी फर्गुसन कॉलेजात प्रवेश घेतला.नंतर ते इग्लंडला गेले.तेथे त्यांनी एडिनबरो विद्यापीठाची एम ए व ऑक्सफर्ड विद्यापीठाची डी लिट या पदव्या मिळवल्या.इग्लंडला असताना त्यांनी वकिलीची पदवी मिळाली. पुरोगामी विचाराचे देशमुख यांनी मुंबईतील सोनार जातीतील विमलाबाई नावाच्या मुलीशी विवाह केला.

🔲 सामाजिक कार्य 🔲

⚫️ १३ व १४ नोवेंबर १९२७ मध्य  त्यांच्याच प्रयत्नातून अमरावतीतील इंद्रभुवन थिएटर मध्ये वऱ्हाड अस्पृश्य परिषद भरविण्यात आली. त्या परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब होते.

⚫️ १९२८ मध्ये अमरावती जिल्हा काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष झाल्यावर त्यांनी सार्वजनिक विहिरी अस्पृश्यासाठी खुल्या केल्या. अमरावतीचे अम्बामंदीर दलितांसाठी उघडे केले. अखिल भारतीय मागास जातीसंघा ची स्थापना त्यांनी केली.

🔲 शिक्षणासाठी कार्य 🔲

⚫️ सन १९२६ मध्ये त्यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय  सुरु केले.

⚫️ पंजाबरावनी १९३० साली शिवाजी शिक्षण संस्थेची  केली. भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना केली.

⚫️ १९२७ मध्ये त्यांनी शेतकरी संघाची स्थापना केली.

⚫️ त्यांनी महाराष्ट्र केसरी  हे वृत्तपत्र चालविले. पंजाबराव देशमुख यांना १९५२ मध्ये केद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला.

⚫️पंजाबराव देशमुखांनी १९५५ साली 'भारत कृषक समाजाची'स्थापना केली.  त्यांचे विद्यामध्ये राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी- विक्री संघाची स्थापना झाली.

No comments:

Post a Comment