Saturday, 17 August 2019

👉अॅमेझॉनचं जगातलं सर्वात मोठं संकुल हैदराबादेत👈


👉जगातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनचा जगातला सर्वात मोठा कॅम्पस भारतात उभारला जात आहे. हैदराबाद येथे कंपनीने यासाठी दहा एकर जागा विकसित केली आहे.

👉हैदराबादमधील नानक्रमगुडा येथे हा आयटी हब तयार होत आहे. येथील नवी इमारत १५ मजली आहे. तिचा एकूण विस्तार ३० लाख चौ. फूट जागेत पसरलेला आहे. यातील १० लाख चौ. फूट जागा तर केवळ पार्किंगसाठी देण्यात आली आहे.

👉सूत्रांच्या माहितीनुसार, ही इमारत जुलैच्या मध्यापासूनच कार्यान्वित झाली आहे, मात्र तिचं औपचारिक उद्घाटन अद्याप झालेलं नाही. या इमारतीची सध्याची क्षमता ७ हजार माणसांची आहे ती सप्टेंबर अखेरपर्यंत ९ हजार माणसांइतकी करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते या संकुलाचं उद्घाटन होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...