Sunday, 25 August 2019

जीना यांचे चौदा मुद्दे

🔹नेहरू रिपोर्ट हा मुस्लिम लीगला मान्य नव्हता. त्यामुळे नेहरू रिपोर्ट चा फेरविचार करण्यासाठी आगाखान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर १९२८ मध्ये मुस्लिम लीगचे दिल्ली येथे अधिवेशन याच्या मध्ये मुस्लिम लीगच्या दिल्ली येथे अधिवेशन भरले व या अधिवेशनाचे जीनांनी मुस्लिम लीगच्या दृष्टीकोनातून पुढील १४ मुद्दे प्रसिद्ध केले ते पुढीलप्रमाणे आहेत.

🔸जीना यांचे चौदा मुद्दे

* हिंदी राज्यघटना संघात्मक ठेवून प्रांताकडे शेषाधिकार असावे.

* देशातील सर्व घटक राज्यांना सारखेच स्वतंत्र प्राप्त व्हावे.

* सर्व कायदेमंडळात अल्पसंख्याकांना योग्य व परिणाम कारक प्रतिनिधित्व मिळावे.

* केंद्रीय कायदे मंडळात एकूण सभासदांच्या १३ प्रतिनिधी मुस्लिम असावे.

* स्वतंत्र मतदार संघ अस्तित्वात राहतील एखाद्या समाजाला स्वतंत्र मतदार संघाचा त्याग करायचा असेल तर करता येईल.

* बंगाल पंजाब वायव्य सरहद्द प्रदेशाची पुनर्रचना करीत असताना मुस्लिम मताधिक्य कमी येणार नाही याची काळजी घ्यावी.

* मुंबई प्रदेशापासून सिंध प्रदेश वेगळा करावा.

* सर्व समाजाला आपल्या धर्माचे आचरण करण्यास प्रचार आणि धार्मिक शिक्षण देण्यास पूर्ण स्वतंत्र राहील.

* वायव्य सरहद्द प्रदेशामध्ये आणि बलुचिस्तान या प्रदेशमध्ये इतर प्रांतासारखा राजकीय सुधारणा राबवाव्यात.

* स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनात मुस्लिमांना योग्य त्या नोकऱ्या प्राप्त व्हाव्यात.

* कोणत्याही कायदे मंडळात समाजाविषयी ठराव पास होत असेल तर त्या ठरावाला त्या समाजातील ३४ सभासदांनी जर विरोध दर्शविला तर तो ठराव पास होऊ नये.

* मुस्लिमांनी संस्कृती, भाषा, शिक्षण संस्था इत्यादींना संरक्षण प्राप्त होण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

* प्रत्येक प्रांताच्या मंत्रीमंडळामध्ये १३ मुस्लिम सदस्य असले पाहिजेत.

* केंद्रीय कायदे मंडळात बदल करायचा असेल तर त्यासाठी प्रांतीय कायदे मंडळाची समंती असावी.

 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...