Thursday, 8 August 2019

​​🇮🇳फोर्ब्जच्या यादीतही पी.व्ही.सिंधूची बाजी🇮🇳

🅾' फोर्ब्ज'ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील महिला खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली.

🅾 त्यात स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू तेराव्या स्थानी आहे.

🅾 या यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

🅾सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील १५ महिला खेळाडूंची यादी फोर्ब्जनं प्रसिद्ध केली आहे.

🅾 त्यात अमेरिकेची दिग्गज टेनिस स्टार सेरेना विल्यम्स अव्वल स्थानी आहे. फोर्ब्जनं २०१९ या वर्षासाठी जाहीर केलेल्या यादीनुसार, सिंधूची कमाई ५५ लाख डॉलर (जवळपास ३८ कोटी ८६ लाख ८७ हजार रुपये) इतकी आहे.

🅾 सेरेना ही पहिल्या स्थानी आहे. तिची कमाई २९.२ दशलक्ष डॉलर आहे.

🅾  दुसऱ्या स्थानी जपानची नाओमी ओसाका आहे. ओसाकाची एकूण कमाई २४.३ दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे.

🅾एंजेलिक कर्बर तिसऱ्या स्थानी असून, तिची कमाई ११.८ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी आहे.

No comments:

Post a Comment