Sunday, 25 August 2019

स्पेनमध्ये जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धेत भारताने दोन सुवर्णपदके जिंकली

स्पेन देशाच्या माद्रिद शहरात खेळविण्यात आलेल्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये ज्युनियर (अंडर-21) मिश्र संघ गटातल्या मार्कू रागिनी आणि सुखबीर सिंग यांच्या जोडीने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.

तसेच भारताची कोमलिका बारी ही स्पर्धेतली रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेती बनली. तिने अंतिम फेरीत जापानच्या सोनोदा वाका हिला पराभूत करून भारतासाठी दुसरे सुवर्णपदक जिंकले. 2009 साली विश्वविजेती बनणार्‍या दिपीका कुमारी नंतर हे जेतेपद जिंकणारी 17 वर्षाची कोमलिका भारताची दुसरी रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेती (18 वर्षाखालील) आहे.

या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण व एक कांस्यपदक असे एकूण तीन पदके मिळवून त्याच्या मोहिमेची सांगता केली. कंपाऊंड ज्युनियर पुरुष संघात भारताने कांस्यपदक जिंकले.

✍जागतिक तिरंदाजी बद्दल

जागतिक तिरंदाजी महासंघ ही तिरंदाजी या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. 156 राष्ट्रीय महासंघ आणि इतर तिरंदाजी संघटना याचे सदस्य  बनलेले आहे आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने त्याला मान्यता दिली आहे. त्याची स्थापना 04 सप्टेंबर 1931 रोजी झाली. स्वित्झर्लंडच्या लुसाने या शहरात त्याचे मुख्यालय आहे.

No comments:

Post a Comment