Friday, 16 August 2019

🌺🌺पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) हे पद निर्माण करण्याची घोषणा 🌺🌺

🔰 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी “सैन्यामधील समन्वय आणखी दृढ करण्यासाठी” चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) तयार करण्याची घोषणा केली.

🔰 भारताच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की या प्रमुख निर्णयामुळे सैन्याने “आणखी प्रभावी” होतील. तसेच सीडीएस सेना, हवाई दल आणि नेव्ही या तीन सेवांमध्ये समन्वय साधेल.

🔰चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणजे काय?

🔴 CHIEF OF DEFENCE STAFF (CDS) :

🔰 चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) पदाची शिफारस 1999 च्या कारगिल युद्धा नंतर प्रथम केली गेली.

🔰 एक उच्चस्तरीय समितीला देशाच्या सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे काम सोपविण्यात आले होते.

🔰 या समितीने भारताच्या तिन्ही सेवांमध्ये समन्वय साधण्यासाठी संरक्षण प्रमुख ची नियुक्ती करण्याची शिफारस केली होती.

🔰 हा अधिकारी संरक्षणमंत्र्यांचा एकल-बिंदू लष्करी सल्लागार (single-point military adviser) असावा,असे समितीने म्हटले होते.

No comments:

Post a Comment