Wednesday, 28 August 2019

दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत बुमराह ठरला अव्वल

✍विंडीज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपली पकड मजबूत बसवली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताने 297  धावांपर्यंत मजल मारली. यानंतर इशांत शर्मा आणि इतर भारतीय गोलंदाजांच्या भेदक
माऱ्याच्या जोरावर भारताने विंडीजला 222  धावांमध्ये गारद केलं. इशांत शर्माने विंडीजचा निम्मा संघ गारद केला.

✍तर त्याला मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 2-2 तर जसप्रीत बुमराहने 1 बळी घेत चांगली साथ दिली.जसप्रीत बुमराहने मात्र केवळ एक बळी मिळवत दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.

✍कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामने खेळून सर्वात जलद 50 बळींचा टप्पा गाठणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह अव्वल स्थानावर पोहचला आहे. त्याने 11 व्या सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली.

✍तसेच बुमराहने वेंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी  यांच्या नावावर संयुक्तपणे असलेला 13 सामन्यांचा विक्रम मोडला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...