Wednesday, 28 August 2019

पूरस्थितीवर मात करण्यासाठी ‘इस्रो’ची मदत

🅾गेल्या पंधरा वर्षांत राज्यातील सर्व नद्यांच्या काठांवरील जमीन वापर पद्धती (लॅण्ड यूज पॅटर्न) कशी बदलली आहे, याचा अभ्यास उपग्रह नकाशांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) मदत घेण्यात येणार असून हा अभ्यास लवकरच सुरू होणार आहे. या अभ्यासातून येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येतील.

🅾यंदा अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागात विशेषत: कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ांना पुराचा फटका बसला. कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळेच कोल्हापूर, सांगलीत पुराची समस्या उद्भवते, असे मानता येणार नाही. कृष्णा खोऱ्याची भौगोलिक स्थिती, अतिवृष्टी हे मुद्देही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पूर परिस्थिती नेमकी कशामुळे तयार होते, याबाबत उपग्रह नकाशांच्या मदतीने नव्याने अभ्यास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या अभ्यासासाठी साधारण एक वर्षांचा कालावधी लागेल. याबाबत मंत्रालय स्तरावर चर्चा झाली आहे.

🅾दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये तसेच उर्वरित राज्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने २३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोजिता केंद्र (महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन्स सेंटर – एमआरएसएसी), भारतीय हवामान विभाग, भारतीय प्रौद्योगिक संस्था (आयआयटी), महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (एमडब्लूआरआरए), जलक्षेत्रातील विश्लेषक यांची तज्ज्ञ अभ्यास समिती गठित केली आहे. ही समितीही राज्यातील नदीकाठांचा डिजिटल विदा तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचना करणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...