Thursday, 29 August 2019

मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून सहा इस्लामिक देशांनी त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले आहे. जाणून घेऊयात याच सहा खास सन्मानांबद्दल...

🏵‘ऑर्डर ऑफ झायेद’ हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

🏵तर २५ ऑगस्ट रोजी बहारिनने ‘किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रिनैसन्स’ हा पुरस्कार देऊन मोदींचा गौरव केला.

🏵पॅलेस्टाईन 'द ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन' हा पुरस्कार मोदींना १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदान करण्यात आला. परदेशी नागरिकांना पॅलेस्टाईनकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

🏵सौदी अरेबिया 'द किंग अब्दुल्लाझीज' हा पुरस्कार सौदी अरेबियातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. मोदींना ३ एप्रिल २०१६ साली एप्रिल महिन्यात हा पुरस्कार सौदी अरेबियाने प्रदान केला.

🏵अफगाणिस्तान 'द आमीर अमनुल्हा' हा पुरस्कार अफगाणिस्तानमधील सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान मोदींना ३ जून २०१६ रोजी प्रदान केला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींनी प्रदान करण्यात आला होता.

🏵मालदीव ८ जून २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘रुल ऑफ निशान इझ्झुदीन’ देऊन गौरवण्यात आले. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment