Tuesday, 20 August 2019

मगरीविषयी बरेच काही ‼️



▪️नुकत्याच आलेल्या पुरात पाण्यातील अनेक मगरी रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. मगर या प्राण्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. पण हा प्राणी नक्कीच काही जाणून घेण्याच्या योग्यतेचा आहे. मगरीचा कराल जबडा पाहतापाहता मोठे प्राणी किती शिताफीने गिळतो हे आपण कदाचित पहिले असेल.

💁‍♂ मगरीला २४ दात असतात पण तरीही ती भक्ष्य गिळणे अधिक पसंत करते.

▪️मगर हा कुठल्याची पाण्यात किंवा जमिनीवर राहू शकणारा प्राणी आहे आणि विशेष म्हणजे ही प्रजाती पृथ्वीवर डायनासोर होते तेव्हापासून म्हणजे २४० दशलक्ष वर्षापासून अस्तित्वात असावी असे संशोधकांचे म्हणणे आहे.

💁‍♂मगरीचे नक्राश्रू अशी मराठीत एक म्हण आहे. याचा अर्थ खोटे रडणे असा आहे.

▪️मगर भक्ष्य गिळते तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू येतात त्यावरून ही म्हण आली असावी. पण त्यामागचे कारण असे की भक्ष्य गिळताना ती खूप मोठ्या प्रमाणावर हवा गिळते. या हवेच्या दाबामुळे अश्रू निर्माण करणारे लचरीमल ग्रंथी कार्यान्वित होतात आणि मगरीच्या डोळ्यात अश्रू येतात.


▪️जगभरात मगरीच्या अनेक प्रजाती आहेत. सर्वात लहान मगर ५ फुट लांब आणि ३२ किलो वजनाची आहे तर सर्वात मोठी ७ फुट लांब आणि १२०० किलो वजनाची आहे.

▪️अन्न भक्षण केल्यावर ते पचविण्यासाठी मगर छोटे दगड खाते. ती फळे, भाज्या खात नाही. लांब शेपटीमुळे ती पाण्यात ताशी २५ किमी वेगाने पोहू शकते.

▪️ स्तनधारी आणि सरपटणारे अश्या दोन्ही प्राण्याचे गुण मगरीत आढळतात. जमिनीवर असताना तिचे हृदय सस्तन प्राण्यासारखे काम करते तर पाण्यात असताना सरपटणारया प्राण्याप्रमाणे काम करते.

✅ मगरीची ९९ टक्के पिल्ले पहिल्या वर्षातच मोठे मासे फस्त करतात.

▪️मगर एकावेळी १० ते ६० अंडी घालते. ही अंडी घरट्यात किंवा बिळात घातली जातात आणि तेथले तापमान किती असेल त्यावर पिलाचे लिंग ठरते.

▪️आज जगभर मगरी संकटात आहेत कारण त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जाते आहे. मगरीच्या कातड्यापासून बनविलेल्या वस्तू श्रीमंत लोकांसाठी स्टेट्स सिम्बॉल बनल्या असल्याने मगरी मोठ्या प्रमाणावर मारल्या जात आहेत.



No comments:

Post a Comment