Thursday, 6 January 2022

प्राकृतिक भूगोल -भुरूपे

✍ प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेली भूरूपे (Landform associated with Fault) : भूपृष्ठात ताण व दाब निर्माण होत असताना खडकांना तडे जातात किंवा भेगा पडतात व भूकवच दुभंगते. या वेळी भूकवचात ऊध्र्वगामी, अधोगामी व क्षितिजसमांतर हालचाल होते. या प्रकारांमुळे भूपृष्ठावर विविध भूरूपे निर्माण होतात. प्रस्तरभंगामुळे पुढील भूरूपे निर्माण होतात-

१) गट पर्वत किंवा विभंग पर्वत (Block Mountain): ज्या वेळी भूकवचाला समोरासमोर दोन समांतर भेगा पडतात, त्या वेळी काही ठिकाणी दोन भेगांच्या दरम्यान असलेला भूकवचाचा भाग वर उचलला जातो. अशा उंच भागास गट पर्वत किंवा विभंग पर्वत असे म्हणतात. उदा. तिबेटचे पठार, ब्राझीलचे पठार, सातपुडा पर्वत, मध्य युरोपातील व्हासजेस, ब्लॉक फॉरेस्ट, संयुक्त संस्थानातील पश्चिमेकडील सिएरा, नेवाडा पर्वत इत्यादी भूरूपे या प्रकारामुळे निर्माण झाली आहेत.

2) खचदरी (Rift Valley): ज्या वेळी भूकवचाला समोरासमोर दोन समांतर भेगा पडतात, त्या वेळी काही ठिकाणी दोन भेगांच्या दरम्यान असलेला भूकवचाचा भाग खाली खचून काही वेळेस अतिखोल, सपाट तळ व अरुंद दऱ्या निर्माण होतात. अशा प्रकारच्या खोलगट भागांना खचदरी असे म्हणतात.
प्रस्तरभंग क्रमाक्रमाने खाली खचतात, त्यातून खचदऱ्या निर्माण होतात. काही वेळा अंतर्गत भागात दोन्ही बाजूंनी ताण पडतो व बाजूचे दोन्ही भूभाग वर उचलले जातात, मध्य भाग खाली खचतो व खोल दरी निर्माण होते.

🌸 हवामानशास्त्र :

✍ यूपीएससीची प्रारंभिक व मुख्य परीक्षा तसेच राज्यसेवेची मुख्य परीक्षा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतर परीक्षांच्या दृष्टीने हवामानशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपण या घटकातील महत्त्वाचे उपघटक अभ्यासणार आहोत.

✍ समभार रेषा : सारखाच दाब असणारे ठिकाण किंवा प्रदेश ज्या रेषेने जोडले जातात, त्यांना समभार रेषा असे म्हटले जाते.

✍ समताप रेषा (Isotherm): समान तापमान असणारी ठिकाणे नकाशावर ज्या रेषेने जोडली जातात, त्यांना समताप रेषा असे म्हणतात.

✍ समवृष्टी रेषा (Isoneph): समान पर्जन्य असणारी ठिकाणे नकाशावर ज्या रेषेने जोडली जातात, त्यांना समवृष्टी रेषा असे म्हणतात.

✍ समअभ्राच्छादित रेषा : एखाद्या विशिष्ट वेळी समान समअभ्राच्छादित असणारी ठिकाणे नकाशावर ज्या रेषेने जोडली जातात, त्यांना समअभ्राच्छादित रेषा असे म्हणतात.

✍ हवेचे तापमान (Air Temperature):तापमानाचे वितरण खालील दोन प्रकारे करतात- तापमानाचे दैनिक व वार्षकि वितरण व तापमानाचे भौगोलिक वितरण.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...