Sunday, 17 October 2021

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 द्विदल वनस्पतींच्या मुळावर असलेल्या गाठीत कोणते जीवाणू असतात ?
* सहजीवी.

💐 कोणत्या पिकाच्या मुळांवर गाठी असतात ?
* हरभरा.

💐 एका झाडाच्या अन्नरसावर जगणारया दुसरया झाडास काय म्हणतात ?
* परजीवी.

💐 बहुतेक वनस्पतींना त्यांचे बरेचसे अन्न कशाद्वारे मिळते ?
* सूर्यप्रकाशाद्वारे.

💐 दिवसा वनस्पती कोणता वायू बाहेर सोडतात ?
* प्राणवायू. ( आॅक्सिजन )

💐 सागरी तसेच तपकिरी शेवाळमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते ?
* आयोडीनचे.

💐 कोयनेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळते ?
* सालीपासून.

💐 हायड्रोग्राफी हे शास्ञ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
* जलवनस्पती.

💐 एखाद्या वृक्षाचे वय कशाच्या आधारावर निश्चित करतात ?
* बुंद्यावरील वलये मोजून.

💐 आल्याचा खाण्यास योग्य भाग कशापासून मिळतो ?
* खोडापासून

💐 वनस्पतीमध्ये असलेला महत्त्वाचा घटक कोणता ?
* सेल्युलोज.

💐 तंतुकणिका काय करतात ?
* ऊर्जानिर्मिती.

💐 वनस्पतींची पाने कमी तीव्रतेच्या प्रकाशात कशी होतात ?
* पसरट.

💐 धोतरयाचे पान आणि बीजामध्ये कोणते विषारी अल्कलाईड असते ?
* धतुरीन.

💐 जीवनद्रव्यामध्ये साधारणपणे किती टक्के पाणी असते ?
* ७५ ते ८० %

💐 चहामध्ये कोणते अपायकारक द्रव्य असते ?
* टॅनिन.

💐 पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात ?
* पोटॅशियम परमॅंगनेट.

💐 अॅनेमिया कशाशी संबंधित आहे ?
* रक्तपेशी.

💐 बेरीबेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
* 'ब' जीवनसत्व.

💐 पायोरिया हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
* हिरड्या.

💐 आयोडीनअभावी कोणता रोग होतो ?
* गलगंड.

💐 वांती व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
* काॅलरा.

💐 बी.सी.जी.ची लस कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून टोचली जाते ?
* क्षय.

💐 शरीरातील कशाचे प्रमाण कमी झाल्यास पंडुरोग होतो ?
* लोहितपेशी व हिमोग्लोबिन.

💐 गंडमाळ ( गाॅयटर ) रोगात कोणत्या ग्रंथीना सूज येते ?
* थायराॅईड.

💐 रक्तातील तांबड्या पेशींचा नाश कोणत्या विकारामुळे होतो ?
* क्षयरोग.

💐 त्वचारोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ?
* 'अ' जीवनसत्व.

💐 बी.सी.जी. लस शरीराच्या बहुधा कोणत्या भागावर घेतात ?
* डाव्या हातावर.

💐 देवी रोगाचे भारतातून कोणत्या साली उच्चाटन झाले ?
* इ.स.१९७६.

💐 सूर्यकिरणांमधील कोणती किरणे जंतूनाशक असतात ?
* अल्ट्राव्हायोलेट.


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...