Sunday, 26 December 2021

🔶राज्य व केंद्रशासित प्रदेशमध्ये काय फरक आहे?

✍केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या पूर्नरचनेचा निर्णय घेतल्यामुळे आता देशात 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश होतील. सद्यस्थितीत भारतात 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. मात्र आता जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जाणार आहे.

✍शिवाय लडाख देखील जम्मू-काश्मीरपासून विभक्त करून त्याला देखील केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला जाणार आहे. असे असले तरी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात नेमका काय फरक आहे? याबाबत अनेकांना माहित नसते. म्हणून आज त्याबाबत जाणून घेऊ... 

🔴राज्य म्हणजे काय? :

● हे भारतीय राज्यघटने अंतर्गत येणारा एक घटक असून ज्याचे स्वतंत्र असे सरकार आहे.
● हे सरकार 'राज्य सरकार' म्हणून ओळखले जाते. या सरकारची निवड जनता मतांद्वारे करते.
● राज्यांना आपले कायदे तयार करण्याचे व त्यात दुरूस्ती करण्याचे अधिकार असतात.
● प्रत्येक राज्याला स्वतंत्र विधानसभा आणि मुख्यमंत्री असतो. या ठिकाणी राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या प्रतिनिधींच्या स्वरूपात असतात.

🔴 केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय? :

● केंद्रशासित प्रदेश हा एक छोटा प्रशासकीय घटक असतो. ज्यावर केंद्र सरकाचे नियंत्रण असते.
● या ठिकाणी थेट केंद्र शासनाचे नियम लागू असतात.
● या नियमांची अंमलबजावणी उपराज्यपालांच्या माध्यमातून होत असते.
● उपराज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात, त्यांची निवड केंद्र सरकार करत असते.
● केंद्रशासित प्रदेशांच्यावतीने संसदेचे उच्च सभागृह म्हणजेच राज्यसभेत नवी दिल्ली आणि पुदुचेरी सोडले तर कोणतेही प्रतिनिधीत्व नसते.

No comments:

Post a Comment