Tuesday, 13 August 2019

☘☘नॉलेज क्लस्टर’मध्ये पुण्यासह सहा शहरांची निवड☘☘

🅾केंद्र सरकारच्या ‘शहर ज्ञान व नवोपक्रम समूह’  (सिटी नॉलेज अँड इनोव्हेशन क्लस्टर्स) उपक्रमात विकासासाठी पुणे, भुवनेश्वर, चंडीगड, जोधपूर, अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता या सहा शहरांची निवड करण्यात आली आहे. या शहरांमध्ये किंवा राज्यात अस्तित्वात असलेल्या संस्था आणि निरनिराळे उद्योग यांच्यात  समन्वय साधण्यासाठी या समूहांची योजना करण्यात येत आहे.

🅾राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या १०० दिवसांसाठी निश्चित केलेल्या अ‍ॅजेंडांतर्गत हा प्रकल्प प्रधान वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) कार्यालयाच्या नेतृत्वाखाली प्राधान्याने राबवण्यात येत आहे.

🅾या सर्व शहरांसाठी ‘कन्सेप्ट नोट्स’ तयार असून, काही शहरांमध्ये चर्चात्मक बैठकी आधीच सुरू झालेल्या आहेत, असे पीएसए कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय स्तरावरील २० प्रयोगशाळा याआधीच भुवनेश्वरच्या यादीवर असून, तीसहून अधिक औद्योगिक घराणी किंवा उद्योगांनी पुण्यात झालेल्या निरनिराळ्या बैठकींमध्ये भाग घेतला.

No comments:

Post a Comment