ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उत्साहास तोड नाही,गरज आहे ती दर्जेदार मार्गदर्शनासह दर्जेदार शैक्षणिक साहित्याची.
वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात येणार्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना लक्षात घ्यावयाच्या काही गोष्टी:
💎अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न चे सखोल विश्लेषण,
💎पायाभूत संकल्पना समज़ुन घेणे अत्यावश्यक बाब,
💎पायाभूत पुस्तकांसह दर्जेदार संदर्भ पुस्तकांचे तौलनिक व विश्लेषणात्मक वाचन व ते उदाहरणासह समज़ुन घेण्यासाठी त्याला चालु घडामोडींची जोड देणे आवश्यक
💎हया गोष्टी करत असताना समोर येणार्या शंकांची नोंदणी करणे आणि शंकांचं निरसन तज्ञ मार्गदर्शकाकरवी करुन घेणे म्हणजे खर्या अर्थाने अभ्यास करणे होय.
💎संवांदासाठी भाषाज्ञान ही आयोगाची उमेदवाराकडुन अपेक्षा आहे त्यासाठी दैनंदिन जीवनात तरतुद करणे योग्य
💎निर्णयक्षमता विकसित होण्यासाठी बुद्धीमत्ता चाचणी व गणित या घटकांचा नियमित सराव अनिवार्य
💎परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव हा अनिवार्य आहे.
💎शारिरिक मानसिक बौद्धिक व आत्मिक स्थैर्यासाठी व्यायाम,ध्यान,वाचन,चिंतन व क्रिडा या घटकांना दिनचर्येत जाणीवपूर्वक स्थान देणे अगत्याचे हे यशस्वी अधिकारी आणि विद्यार्थी यांच्या प्रवासाचा धांडोळा घेतल्यानंतर समोर आलेल्या बाबी आहेत.या सह स्वसंवाद,कुटुंबाशी सुसंवाद,सौह्रार्दपुर्ण वातावरणात राहणे आवश्यक आहे.
💎तज्ञांचं मार्गदर्शन आणि दर्जेदार शैक्षणिक साहित्य हे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचं गमक आहे.
💎परिस्थिती आणि संकंटांचं बाऊ करु नका,
💎मिळालेल्या संधीचं सोनं करा,
💎सर्व विषयांच्या संकल्पना स्पष्ट करुन घ्या,त्यांचा दैनंदिन जीवनात असलेला अर्थ पहा,
💎अवघड तेवढ्याच घटकाच्या स्वत:च्या नोट्स डेव्हलप कराव्यात तेही अनेकवेळा वाचन झाल्यावरच.
💎नियोजनाशिवाय अभ्यास ध्येयपुर्ती मधील सर्वात मोठा अडसर आहे.
💎रिव्हिजन(उजळणी) हा महत्वाचा भाग आहे या परीक्षांमध्ये
💎सि सॅट मध्ये चांगला स्कोअर हवा असेल तर सरावाशिवाय पर्याय नाही
💎परीक्षा पास होण्यासाठी पेपर सोडवण्याचा सराव महत्वाचा,
💎आपली दिनचर्याच आपल्याला आपल्या ध्येय्यापर्यंत घेवुन जाते,
💎कुटुंबाशी असलेलं पारदर्शक नातं मनोबल अबाधित ठेवणारं असतं,दिर्घकालीन सातत्य राखुन,स्वत:शी प्रामाणिक राहुन आणि संयमाने करावयाच्या अभ्यासाला मनोबलाची आवश्यकता आहे.
💎समाज माध्यमं वाईट नाहीत परंतु अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारा दिर्घकालीन एकाग्र चित्ताने करावयाचा अभ्यासातला अडसर मात्र आहे म्हणुन शक्यतो अंतर राखलेलं बरं.
💎भाषांवर प्रभुत्व असेल तर मुख्य आणि मुलाखत या परीक्षेच्या टप्प्यात जमेची बाजु ठरु शकणारा भाग असेल.
No comments:
Post a Comment